चांगला श्वास घेणारा जगातील सर्वात श्रीमंत माणूस..
— प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे
देवराई अधिक प्रभावीपणे राबविणार
— आ.सुरेश धस
आष्टी प्रतिनिधी : मला माझ्या आयुष्यात हे लक्षात आले आहे की, जगात आई असणे आणि वृक्ष असणे या दोन गोष्टी सारख्या असून आई नसती तर आपण नसतो आणि वृक्ष नसते तर जगातला कोणताही व्यक्ती शिल्लक राहिला नसता असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन प्रसिद्ध सिने अभिनेते आणि देवराई चे निर्माते संस्थापक सयाजी शिंदे यांनी केले.
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील महादेव दरा या ठिकाणी देवराई संस्थेमार्फत विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात येणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते.
यावेळी आष्टी विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य आमदार सुरेश धस, महादेव दरा देवस्थानचे मठाधिपती कल्याण महाराज कोल्हे, सरपंच परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, जिल्हा वन अधिकारी अमोल गरकळ,सरपंच नंदकिशोर करांडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, सध्या पर्यावरणाचा असमतोल झाल्यामुळे श्वास घेणेदेखील मुश्किल झाले असून चांगला श्वास घेणारा माणूस हा जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे असे मी समजतो त्यामुळे जगात आई आणि वृक्ष या दोघांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगत ते म्हणाले की, हे रचनात्मक कार्य असून त्यामुळे देवराई च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर याविषयी आपण काम करत आहोत आमदार सुरेश धस यांनी याविषयी संपर्क केल्यामुळे मी या ठिकाणी आलो असून आपण माणूस म्हणून सर्व गोष्टींकडे पाहिले पाहिजे असे सांगत जात धर्म पंथ विरहित रचनात्मक कार्य आपण करत असून आष्टी तालुक्यातील महादेव दरा देवराई च्या माध्यमातून या ठिकाणी अत्यंत दर्जेदार वृक्षांची लागवड करून त्यामध्ये आंबा,चिंच,विविध प्रकारचे गवते यासारख्या देशी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येईल ज्या देशांमध्ये या प्रकारची झाडे आहेत तो देश जगात श्रीमंत देश समजला जाणार आहे महादेव जरा वन देवराई हेदेखील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प समजून पशुपक्ष्यांसाठी विघातक असलेल्या नावाची वनस्पती चे समूळ उच्चाटन करून या ठिकाणी दर्जेदार वृक्षांची लागवड करण्यात येईल सुरुवातीला एप्रिल महिन्यामध्ये देवराई संस्थेचे तज्ञ येऊन या ठिकाणी पाहणी करतील सर्वेक्षण करतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरुवात होणार आहे.बीडसांगवी येथील महादेव दरा या ठिकाणी देवराई च्या माध्यमातून पशुपक्ष्यांसाठी विषारी ठरणाऱ्या ग्लॅरीसिडिया या वनस्पतीचे समूळ उच्चाटन करण्यात येणार असून देशी वृक्ष असलेल्या आंबा चिंच मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करण्यात येणार आहे.
बीडसंगवी येथे माझ्या आग्रहास्तव महादेव दरा शिवारात आलेले प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या कडे मी मागणी करताच देवराईच्या माध्यमातून जवळपास 25 एकरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाणारा आहे.याचा वृक्षप्रेमी असल्याने मनस्वी आनंद होत आहे. या देवराई वृक्षारोपण करत प्रभावीपणे अंमलबजावणी करून स्वतः जातीने लक्ष देत जबाबदारीने राबवणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी यावेळी बोलताना केलेह. भ. प कल्याण कोल्हे महराज सेवा सेवा सोसायटी चेअरमन सुभाष गणगे, रणजीत ढोबळे,मल्हारी करांडे,जालिंदर नरवडे, बाबासाहेब नरवडे, विजय डुकरे, राजु करांडे विजय जाधव सतोष नरवडे, उद्धव नरवडे, ललेश नरवडे, बाबासाहेब शिंदे,जाकीर शेख, रफिक शेख,संजय डुकरे,रामराव पाटील, रामराव शेळके,शहादेव चव्हाण,सोमनाथ घुले, गोकुळ नरवडे, बारकु ढोबळे, कल्याण मोहळकर,आसाराम पाटील, नामदेव जाधव, दादासाहेब साळवे,पोपट करडुळे, महादेव करडुळे, लहु करडुळे, बापुराव गणगे, रामदास गणगे, महादेव गणगे, महादेव शेळके,हिराजी बाबणे आदीसह बीडसांगवी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.