बीडच्या औद्योगिक विकासाला येणार गती: जमिन पाहणी;मुख्यमंत्र्यांशी केला पत्रव्यवहार
बीड: जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीड येथील औद्योगिक वसाहत अर्थात एमआयडीसीच्या विकासाला गती मिळावी त्यातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा व औद्योगिक विकासात बीड जिल्हा पुढे यावा यासाठी बीड विधानसभेचे आमदार संदीपभैय्या क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत शुक्रवारी (दि.७) त्यांनी एमआयडीसी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बीड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेत चर्चा केली. जमिन पाहणी करण्यात आली असल्याचे सांगत याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, यांच्याकडे रीतसर पत्रव्यवहार केला आहे
बीड येथील एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांनी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या या बैठकीला एमआयडीसी विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, प्रादेशिक अधिकारी अधिकारी अमित भामरे व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थित होते. बैठकीत बीड शहरातील एमआयडीसीचा विकास याबाबत व्यापक चर्चा करण्यात आली. ही बैठक सकारात्मक ठरली. दरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांनी या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. बीड एमआयडीसीचा विकास व्हावा या ठिकाणी मोठे उद्योग यावेत, यातून रोजगार निर्मिती व्हावी यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. एमआयडीसीसाठी जमिनीची पाहणी देखील झाली असून यापुढील काळात बीड जिल्ह्याचा औद्योगिक विकास होईल अशी भावना व्यक्त करण्यात आली.