जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये कामकाज बंद आंदोलन करणार -कुंडलिक खांडे
ग्रामपंचायत सर्व लोकप्रतिनिधींच्या पाठीशी सरपंच संघटना ठामपणे उभी-कुंडलिक खांडे
बीड प्रतिनिधी
केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे भर दिवसा अपहरण करून त्यांचा एका टोळक्याने खून केला. हा प्रकार अतिशय निंदनीय आहे आणि लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपीस जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत मध्ये कामकाज बंद आंदोलन करणार असा इशारा सरपंच उपसरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक खांडे यांनी दिला आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीची भर दिवसा अशा प्रकारे होणारी हत्या म्हणजे लोकशाहीचीच हत्या असल्याचेही कुंडलिक खांडे यांनी म्हटले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खांडे यांनी म्हटले आहे की देशमुख यांचे अपहरण होऊन खून होणे हा बीड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना विचार करणारी घटना आहे. जर एखाद्या लोकप्रिय अशा प्रकारे हल्ले होत असतील तर ही लोकशाही कशी म्हणायची असा असावा करत खांडे यांनी म्हटले की आज लोकप्रतिनिधींवर असे हल्ले होत आहेत तर सर्वसामान्यांचे काय. देशमुख खून प्रकरण हे लोकशाहीला काळीमा फासणारे असून या प्रकरणातील मुख्य आरोपीस पोलीस प्रशासनाने त्वरित अटक करावी अन्यथा बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतचे कामकाज आम्ही बंद करू. देशमुख खून प्रकरणातील घुलेनामक जो मुख्य आरोपी आहे त्याच्यासह इतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सरपंच सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक खांडे यांनी केली आहे