अंबाजोगाई: केज विधान सभा मतदार संघात एकही उद्योग न आल्याने युवकांना रोजगाराच्या संधीच उपलब्ध झाल्या नाहीत, हे विद्यमान आमदाराचे अपयश नव्हे का असा सवाल माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सोमवारी (ता.१८) एका काॅर्नर बैठकीत केला.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई शहरात शहराच्या विविध भागात आयोजित बैठकीत बोलत होते. शहरातील रविवार पेठ, फालोअर्स क्वार्टर स्नेह नगर, झारे गल्ली या भागात मतदारांशी संवाद साधला
याप्रसंगी डाॅ.नरेंद्र काळे, मनोज लखेरा, राजेंद्र मोरे, खालेद चाऊस, शेख रमीज, समियोद्दिन खतीब, अमोल लोमटे, गणेश मसने, सुनील वाघाळकर, हाजी खालेक, ॲड. इस्माईल गवळी, अमजद शेख आदींची उपस्थिती होती. महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे हे सर्वसामान्यांचे उमेदवार असून कार्यशील व्यक्तीमत्व आहे. त्यांना सर्व मतदारातून पाठबळ मिळू लागल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकु लागल्याची टिकाही राजकिशोर मोदी यांनी केली. येणाऱ्या काळात नगर परिषदेच्या माध्यमातून घरकुल योजना प्रभावीपणे राबविण्याचे धोरण अवलंबिनार असल्याचे मोदी यांनी सांगितले.
शेख रमीज, राजेन्द्र मोरे, महादेव आदमाने यांनी मागील पाच वर्षातील समस्या मांडल्या. युवा कार्यकर्ता संजय टिपरे यांनी प्रभागातील समस्या मांडल्या.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशातील नागरिकांना एकच मतदान देण्याचा मूलभुत अधिकार दिला असून त्या अधिकाराचा वापर सर्वांनी करावा असे आवाहन डॉ. नरेंद्र काळे यांनी केले.