विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ जयसिंग पंडित यांची गेवराईत भव्य प्रचार रॅली
गेवराई प्रतिनिधी : शिवछत्र परिवार कोणालाच एकेरी भाषेत बोलत नाही. सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जाते. ही दादांची आम्हाला शिकवण आहे परंतु आमच्या विरोधकांकडे विकासाचे कसलेच व्हिजन नसल्याने माझ्या भावांवरती एकेरी भाषेत टीका करीत आहेत, हे त्यांच्यासाठी अशोभनीय आहे. या दोघांची आतून मिली भगत आहे त्यांची ही छुपी युती जनतेने हाणून पाडावी. विरोधकांनी वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा विकासावर बोलावे असा सल्ला जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन जयसिंग पंडित यांनी दिला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ शहरात पदयात्रा काढून संपूर्ण शहर ढवळून काढले त्यांच्या पद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याबाबत अधिक वृत्त असे की, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या नियोजनबद्ध प्रचाराने सध्या तालुका भरात चांगलाच जोर धरला आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. संपूर्ण तालुका भरात विकासाच्या मुद्द्यावर उमेदवार विजयसिंह पंडित हे जनतेसमोर जात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन जयसिंग पंडित यांनी शहरातून पदयात्रा काढून संपूर्ण शहर ढवळून काढले, तसेच प्रभाग क्रमांक एक मधील प्रचार जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शहरातील नागरिकांशी संवाद साधताना ते म्हणाले की, विरोधकांनी टीका जरूर करावी, पण भान राखून बोलावे. आम्ही कोणाला एकेरी भाषेत बोलत नाहीत. ते आमचे संस्कार नाहीत. तुम्ही विकासावर का बोलत नाहीत. आमच्या बांधकामांना नगरपालिका परवानगी देण्यासाठी चालढकलपणा करते. विरोधक आतून दोघे एकच आहेत. त्यांची तीन-तीन मजले मुख्य रस्त्यावर नियम डावलून उभारले आहेत . पालिका त्याला परवानगीही देते. यांची छुपी युती नागरिकांनी आता ओळखायला हवी. तुमचे एक एक मत हे विकासाला आहे यंदा स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या रूपाने तुम्हाला दिला आहे. त्यांना येत्या २० तारखेला प्रचंड मताने विजयी करून तालुक्याच्या विकासासाठी घडयाळीचा गजर करा असे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले आहे.
याप्रसंगी त्यांनी गेवराई शहरातील प्रभाग क्रमांक एक संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले तसेच कोल्हेर रोड, शिवाजीनगर, नवीन बस स्थानक, कोर्ट रोड, जुने बस स्थानक आदींसह शहरातील मुख्य रस्ते बाजारपेठ पिंजून काढली. नागरिकांनी उत्तम प्रतिसाद त्यांना दिला. याप्रसंगी काढण्यात आलेल्या प्रचार पदयात्रेला भव्य स्वरुप प्राप्त झाले होते. यावेळी त्यांच्यासमवेत बप्पासाहेब मोटे, ॲड. एच.एस. पाटील, मोहम्मद गौस, भास्कर अण्णा काकडे, जालिंदर पिसाळ, नजीब सय्यद, राजू भाई कुरेशी, वाहेद भाई, भारतराव पंडित, शामराव पाटील, आवेझ शरीफ, खाजामामु शेख, सरवरखाँ पठाण, श्याम काका येवले, बंडू मोटे, रा.काँ.चे शहर अध्यक्ष दिपक आतकरे, जे. के. बाबुभाई, छगन गिरी, संजय पुरणपोळे, अक्षय पवार, जयसिंग माने, बाबू बेद्रे, रहीम शेख, रफीक सय्यद, नसीर शेख, सुभाष गुंजाळ आदींसह मान्यवर नागरिक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.