मराठा आरक्षणाचा लढा लढले नाही तर लोकनेते विनायकराव मेटेंची पत्नी म्हणून नाव लावणार नाही – डॉ. ज्योती मेटे यांची प्रतिज्ञा
बीड प्रतिनिधी :अपक्ष उमेदवार डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांचा प्रत्यक्ष गाव भेटीवर जास्त भर आहे. काल सकाळी त्यांनी शहरात प्रचार रॅली काढली तर संध्याकाळी पुन्हा ग्रामीण भागाचा दौरा केला. गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाची लढाई विधिमंडळात आणि रस्त्यावर अण्णासाहेब पाटलांच्या निधनानंतर स्वर्गीय मेटे साहेबांनी लढली आणि आता ती लढाई सक्षमपणे मनोज दादा जरांगे पाटील प्रभावीपणे लढत आहेत. आता त्यांच्या सोबत विधिमंडळातील लढाई ही डॉ.ज्योती विनायकराव मेटे लढणार आहे. हा माझा शब्द आहे आणि विधिमंडळात लढा नाही लढले तर लोकनेते विनायकराव मेटेंची पत्नी म्हणून नाव लावणार नाही. अशी प्रतिज्ञा त्यांनी कोल्हारवाडी येथे संपन्न झालेल्या बैठकी वेळी केली.
मराठा आरक्षणासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील ,अण्णासाहेब जावळे पाटील आणि लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्यासह शेकडो मराठा समाजातील बांधवांचे बलिदान गेले आहे. मनोज दादा जरांगे पाटील आता हा लढा सक्षमपणे पुढे नेत आहेत. त्याचबरोबर अनेक जाती एकत्र येऊन समाज तयार होतो. मला या निमित्ताने आवर्जून सांगावेसे वाटते की लोकनेते विनायकराव मेटे साहेबांनी मराठा आरक्षणाबरोबरच धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण प्रश्न विधिमंडळात मांडला असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.