९ डिसेंबर रोजी नगर पालिकेवर शिवसंग्रामचा जन आक्रोश मोर्चा निघणारच – प्रभाकर कोलंगडे
मोर्चाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत प्रभाकर कोलंगडे यांचे प्रतिपादन बीड (प्रतिनिधी) बीड नगर पालिकेच्या गलथानपणाचा कारभार आणि भ्रष्टाचारा विरोधात दि. ९ डिसेंबर रोजी नगर पालिकेवर शिवसंग्रामच्या वतीने जन आक्रोश मोर्चा आ. विनायकराव मेटे यांच्या नेतृतवाखाली काढण्यात येणार होता. परंतु आ. विनायकराव मेटे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते या मोर्चाला उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र आ. मेटे जरी या मोर्चाला उपस्थित राहू शकणार नसले तरी हा मोर्चा ठरलेल्या दिवशीच निघणार असल्याचे प्रतिपादन भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी रविवारी शिवसांग्रम भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रतिपादन केले या वेळी शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, ज्येष्ठ नेते खालेक पेंटर, युवक जिल्हा अध्यक्ष रामहरी मेटे , सुहास पाटील, ॲड. राहुल मस्के हे उपस्थित होते. बीड नगरपालिकेमध्ये क्षीरसागर कुटुंबाची मागील ३५ वर्षापासून सत्ता आहे . त्यांची स्वतःची वैयक्तिक मालकी असल्यासारखा नगरपालिकेचा कारभार हे करत आहेत . केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे बीड नगरपालिकेमध्ये मागील ३५ वर्षामध्ये हजारो कोटी रुपये विविध विकास कामाच्या नावाने क्षिरसागर कुटुंबानी आणले आहेत , परंतु हे हजारो कोटी रुपयाचे त्यांनी केले काय हा मोठा प्रश्न बीडकरांना पडला आहे . एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे येऊनही ऐन पावसाळयामध्ये सुध्दा १५ दिवसांनी पाणी बीडकरांना मिळते , शहरामध्ये स्वच्छता नाही , जागोजागी कचरा पडलेला दिसतो आहे , गल्ली बोळामध्ये नाल्या नाहीत , जिथे आहेत तिथे नाले सफाई होत नाही, कचरा उचलला जात नाही, रस्त्यासाठी वाटेल तेवढा निधी आला पण एकही रस्ता नीट नाही. शहरामध्ये सगळीकडे धुळीचे साम्राज्य आणी अस्वच्छ पाणी ,तुंबलेले गटार या मुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आले. तसेच साथरोगाने व डेंग्युने अनेक लोक मरण देखील पावले आहेत हे केवळ नगरपालिकेच्या गलिच्छ कारभारामुळे आणि क्षिरसागर कुटुंबाच्या भ्रष्टाचारामुळे, क्षिरसागर कुटुंबियांना स्वतःच्या स्वार्थाच्या पुढे काहीही दिसत नाही त्यामळे या झोपलेल्या नगर पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी आणि नगर पालिकेचा कारभार सुधारून जनतेला सुख सोयी उपलब्ध करून देण्यासाठी ९ डिसेंबर रोजी नगर पालिकेवर शहरातील नागरिकांना सोबत घेऊन जन अक्रोश मोर्चा कोरोनाचे सर्व नियम पाळत काढण्यात येणार असल्याचे प्रभाकर कोलंगडे यांनी पत्रकार परिषदेत...