गेवराई प्रतिनिधी : गेवराई विधानसभा मतदार संघातील मतदारांनी आदरणीय शिवाजीराव (दादा) पंडित कुटूंबियावर जीवापाड प्रेम केलेले आहे. त्याच्याच बळावर आदरणीय शिवाजीराव दादांनी गेवराई विधानसभा मतदार संघामध्ये आपल्या राजकीय जीवनामध्ये सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून काम केले, तालुक्याचा सर्वांगिन विकास केला, त्यांचाच वारसा सक्षमपणे आम्ही पुढे घेवून जात आहोत. बदलणाऱ्या काळाबरोबर आपल्याला चालायचे आहे, नवनवीन योजना, उद्योगधंदे आणि रोजगाराच्या संधी आपल्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये हे सर्व साध्य करण्यासाठी महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना विजयी करा, मतदार संघातील मतदार मायबापांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही असे प्रतिपादन युवा नेते पृथ्वीराज जयसिंग पंडित यांनी केले. विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणच्या कॉर्नर बैठकामध्ये ते मतदारांशी संवाद साधताना बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ युवा नेते पृथ्वीराज जयसिंग पंडित यांनी गेवराई विधानसभा मतदार संघ अक्षरशः पिंजून काढला आहे. त्यांनी सावरगाव, साठेवाडी, कोळगाव, गाढेवाडी, पोखरी, तरटेवाडी, माळहिवरा, मुधापूरी, शिराळा, ठाकर आडगाव, कोलतेवाडी, बेलगूडवाडी आदी गावांचा प्रचार दौरा करून उमेदवारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी कॉर्नर बैठकांमध्ये मतदारांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले की, आदरणीय अमरसिंह पंडित यांनी कधीही स्वार्थी राजकारण केलेले नाही मतदार संघाचा विकास हे आपले कर्तव्य समजून त्यांनी आपले काम केलेले आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच विजयसिंह पंडित यांनीही आपली वाटचाल सुरु केलेली आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना विजयसिंह पंडित यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून बीड जिल्ह्याला एक नवी ओळख करून दिली. विकासाचा ध्यास असणाऱ्या अशा नेतृत्वाला संधी देण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे, त्यामुळे विरोधकांच्या प्रलोभनाला न भुलता येणाऱ्या २० तारखेला घड्याळ या चिन्हासमोरचे बटन दाबून विजयसिंह पंडित यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी सावरगाव येथे महादेव जाधवर, आसाराम पिसाळ, आश्रुबा गव्हाणे, लहूराव पिसाळ, श्रीराम डोंगरे, साठेवाडी येथे रावसाहेब धोत्रे, वैजिनाथ अनभुले, जिजाभाऊ अनभुले, बाबासाहेब पवार, राजेंद्र गुजर, आनंद अनभुले, कोळगाव येथे मदनराव घाडगे, राजेंद्र कदम, विष्णूपंत जगदाळे, रमेश करांडे, मनोहर घाडगे, रमेश लोंढे, सुरेश जाधव, गाढेवाडी येथे सखाराम गाडे, महादेव गाडे, मसू मोरे, शिवाजी मोरे, तुळशीराम वावरे, पोखरी येथे शेख अकबरभाई,पांडुरंग काजळे, अशोक मोघे, श्रीराम मोघे, कल्याण हाडूळे, शेख सादेक, मुधापूरी येथे भाऊसाहेब गिरे, काका गिरे, भाऊसाहेब गिरे, जालिंदर हाटवटे, कल्याण गिरे, हनुमान गिरे, रामभाऊ भोले, माळहिवरा येथे बाजीराव माळी, तुकाराम माळी, विठ्ठल माळी, कैलास माळी, अंकुश पवार, लहू हातमोडे, महादेव थोरात, राधेशाम काकडे, शिवाजी काकडे, एकनाथ काकडे, शिराळा येथे ज्ञानेश्वर तेलुरे, राम तेलुरे, अमोल तेलुरे, ईश्वर तेलुरे, सादेक पठाण, रहिम पठाण, मनोज तेलुरे, ठाकर आडगाव येथे रुद्रा घोलप, अरुण कोकाट, सुधाकर कोकाट, रामेश्वर कोकाट, बालासाहेब काळे, आकाश सोनवणे, रावसाहेब जाधव, अशोक चव्हाण, साईराम पांढरे, कोलतेवाडी येथे अनिल पवार, लहू पवार, बाळू मुळक, गोविंद अबदर, राहुल पवार, गणेश जगताप, दत्ता पवार यांच्यासह ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पृथ्वीराज पंडित यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचे वाजत-गाजत स्वागत केले. विजयसिंह पंडित यांना आमदार करून येणाऱ्या २० तारखेला शिवछत्र परिवारावर गुलाल उधळून असा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.