एका दिवसात “तीनशे” गावकर्यांनी घेतली कोरोना लस
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : कोरोनाला हरवण्यासाठी जिल्हा प्रशासन जोमाने काम करत असले तरीही जिल्ह्यात कोरोना लाॅक होण्याचे नाव घेताना दिसत नाही. परंतु पाटोदा तालुक्यातील घुमरा पारगाव येथील ग्रामस्थांनी कोरोनाला हरवण्यासाठी कोव्हिड लसीकरणाला महत्व देत आज (ता. ०३) दिवसभरात ३०० ग्रामस्थांनी लसीकरण करुन घेतले. गावकर्यांच्या या प्रतिसादामुळे आरोग्य विभागाने गावकर्यांचे अभिनंदन केले.
केंद्र शासनाच्या सुचने नुसार जिल्हा आरोग्य विभागाकडुन ४५ वर्षावरील सर्वांना कोव्हीड लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आज डोंगरकिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतिने पाटोदा तालुक्यातील घुमरा पारगाव येथे कोव्हिड लसीकरण करण्यात आले. याला येथील ग्रामस्थांनी भरभरुन प्रतिसाद देत दिवसभरात ३०० ग्रामस्थांनी लसीकरण करुन घेतले. सध्या जर कोरोनाला हरवायचे असेल तर सर्वांनी कोव्हिड लसीकरण करुन घेण्याची गरज आहे. ज्याला जसे जमेल तसे नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याची गरज निर्माण झाली आहे. याकरिता श्री गुलाबराव घुमरे पदमाकर घुमरे सरपंच दत्ता साठे राज घुमरे व इतरांनी विशेष परिश्रम घेतले .
प्रतिक्रिया
आज पारगाव याठिकाणी ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना कोव्हिड लसीकरण करण्यात आले. आमचे दिवसाचे २०० लसीकरणाचे नियोजन असते, परंतु येथील नागरिकांनी लसीकरणास प्रतिसाद दिल्यामुळे ३०० जणांचे लसीकरण एका दिवसात पुर्ण झाले. कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण खुप महत्वाचे आहे. यामुळे ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे.
(डाॅ.मयुर शिंदे, आरोग्य अधिकारी डोंगरकिन्ही)