सर्व्हेक्षण कामाच्या उद्घाटन प्रसंगी अमरसिंह पंडित यांचे प्रतिपादन
गेवराई प्रतिनिधी ः- गेवराई विधानसभा मतदार संघात सिंचन व्यवस्था वाढवून हरितक्रांती करण्याचे स्वप्न उराशी बाळगून सातत्याने या कामासाठी पाठपुरावा करत आहे. सिंदफणा नदीपात्रातील अंकुटा, ईटकुर, औरंगपूर, कुक्कडगाव, खुंड्रस व नाथापूर आणि बिंदुसरा नदीपात्रातील नामलगाव को.प.बंधाऱ्याचे निम्न पातळी बंधाऱ्यात रुपांतर करण्याच्या कामाला शासनाने मंजुरी दिली असून कामाचे सर्व्हेक्षण आणि अंकेक्षण कामाचा शुभारंभ ईटकुर आणि नामलगाव येथे करण्यात आला. यावेळी अमरसिंह पंडित बोलत होते. सिंदफणेबरोबरच बिंदुसरा नदीपात्र सुध्दा पाणीदार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गेवराई विधानसभा मतदार संघातील सिंचन व्यवस्था वाढविण्यासाठी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित सातत्याने प्रयत्न करत आहेत. गेवराई विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करताना त्यांनी सिंदफणा नदीवरील सिरसमार्ग बॅरेज आणि केकतपांगरी साठवण तलावाची कामे पूर्ण केली आहेत. सिंदफणा नदीवर टाकळगाव बॅरेजसह अंकुटा, ईटकुर, औरंगापूर, कुक्कडगाव, खुंड्रस व नाथापूर या को.प.बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतर करणे आणि बिंदुरसरा नदीवरील नामलगाव को.प.बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याच्या कामासाठी अमरसिंह पंडित सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून या सर्व कामाच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली आहे.
रविवार, दि.६ ऑक्टोबर रोजी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते ईटकुर आणि नामलगाव येथे सर्व्हेक्षण कामाचा शुभारंभ करण्यात आला. या नवीन सात बॅरेजच्या कामामुळे सुमारे १३४९ हेक्टर शेतजमीन नव्याने ओलिताखाली येणार आहे. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी मुख्य प्रचाराचा हाच मुद्दा केला होता. लोकसभा निवडणुकीवेळी चुकला असाल तरी विधानसभेच्या निवडणुकीत बटन दाबताना हे सिंचन वाढणार असल्याचे लक्षात ठेवून विजयसिंह पंडित यांनाच निवडून देण्याचे आवाहन अमरसिंह पंडित यांनी यावेळी केले.
ईटकुर येथे झालेल्या कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, संचालक श्रीहरी पवार, बीड पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विशाल हात्ते, ह.भ.प. हनुमान महाराज, सरपंच विकास रकटे, माजी सरपंच वसंत ढेंगळे, चेअरमन चंद्रकांत जाहेर, माजी सरपचं माणिकराव मासाळ, वैजिनाथ मासाळ, खरेदी विक्री संघाचे संचालक सोमेश्वर गचांडे, पांडुरंग शिराम, संतोष शिराम, दिगांबर मासाळ, जालिंदर डोमाळे, राजाभाऊ परदेशी, प्रल्हाद देवकते, दिनकर खताळ, भगवान कोठेकर, गोरख मासाळ, दत्तात्रय शिराम, चंद्रकांत मासाळ यांच्यासह ईटकुर, शिंपेगाव, आहेरचिंचोली, खामगाव, नांदुर हवेली आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर नामलगाव येथे झालेल्या कार्यक्रमाला बीड बाजार समितीचे उपसभापती शामराव पडुळे, संचालक बळीराम चव्हाण, सरपंच अशोक ढास, सरपंच फारुख पटेल, शेख रईस, शाहेद पटेल, मच्छिंद्र पदमुले, माजी सरपंच गोविंद शेळके, उपसरपंच संदीप पाटील, अजय घोडके, उपसरपंच दत्ता तिपाले, रामदास महाराज बुधनर, विश्वांभर गाडे, अशोक लांडे, प्रविण तोडकर, रमेश कदम, विकास मोरे, शहादेव घोडके, कल्याण सावंत, जगन्नाथ सावंत, गोवर्धन सावंत, गणेश सावंत, कल्याण बांड यांच्यासह घोसापूरी, सौंदाणा, कुमशी, बेलापूरी, शिदोड, लोळदगाव, कुर्ला, माळापूरी, पेंडगाव आदी गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.