बीड, आष्टी, अंबाजोगाई, केज या तालुक्यात जास्त रुग्ण
बीड । प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना आकडेवारी जास्त येत असून आज सुद्धा जिल्ह्यात 383 नव्या रुग्णांची भर पडली. यात बीड, आष्टी, अंबाजोगाई, केज या तालुक्यात सर्वात जास्त रुग्ण आढळून आले. लॉकडाऊन असून सुद्धा कोरोना आटोक्यात येत नसल्यामुळे जिल्ह्याच्या चिंतेत भर पडत आहे.
आज दुपारी आरोग्य विभागाकडून 2679 अहवालाचा रिपोर्ट प्राप्त झाला. यात 2296 रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 383 रिपोर्ट पॉझीटिव्ह आले. यात बीड-108, अंबाजोगाई-84, आष्टी-39, धारूर-16, केज-38, माजलगाव-19, परळी-18, पाटोदा-29, शिरूर-10, वडवणी-9 असे रुग्ण जिल्हाभरात मिळून आले.
कोरोनाचा आकडा कमी होत नसल्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात विविध उपाय राबविण्यात येत आहेत. यासह कोविडचे लसीकरण सुद्धा जिल्ह्यात मोठठ्या प्रमाणात सुरू असून लसीकरणाला जिल्ह्यातील नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोना रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी कोविड नियमाचे पालन करून कोरोनाला हरवण्याची गरज आहे.