Beed : गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात आज (ता. २६) संध्याकाळी वीज पडून तीन महिलांचा मृत्यू झाला. यासह यात एक महिला जखमी झाली आहे. जखमी महिलेवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विजया राधाकिसन खेडकर (वय ४५), शालन शेषराव नजन (वय ५५), लंका हरिभाऊ नजन (वय ४२) अशी मृत महिलांची नावे आहेत. यमुनाबाई माणिक खेडकर या जखमी झाल्या आहेत.या सर्व महिला शेतातील कामे करत होत्या. अचानक पावसाचे वातावरण बनून विजा कडाडल्या, यानंतर सर्व महिला सुरक्षित ठिकाणी जात होत्या, परंतु सुरक्षित ठिकाणी जाण्यापुर्वी त्यांच्यावर वीज पडली. यात तीन महिलांचा मृत्यु झाला तर एक महिला जखमी झाली आहे. या घटनेने चकलंबा परिसरात दुख:चा डोंगर कोसळला आहै.

















