जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना जिल्हाधिकारी पदावरून हटवले
प्रारंभ वृत्तसेवा
Beed : बीड लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक तक्रारी झाल्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची बदली होईल अशी शक्यता होती. अखेर त्यांना बीडच्या जिल्हाधिकारी पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांना जिल्हाधिकारी म्हणून पदभार देण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुका संपल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्याचे वारे आता वाहू लागले आहे. बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून वर्षभरापूर्वी आलेल्या दीपा मुधोळ मुंडे यांची कारकीर्द बीडमध्ये निराशजनक ठरली. महिला जिल्हाधिकारी म्हणून बीड जिल्ह्यात काहीतरी अमुलाग्र बदल करतील अशी अपेक्षा दीपा मुंडे यांच्याकडून होते, परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या आरोपांमुळे त्यांच्या तक्रारी वरिष्ठांकडे गेल्या होत्या, या सर्व बाबींच्या अनुषंगाने त्यांना तात्काळ बीडच्या जिल्हाधिकारी पदावरून हटवण्यात आला आहे. त्यांच्या जागी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांना जिल्हाधिकारी म्हणून पदभार देण्यात आला आहे. अविनाश पाठक यांना बीड जिल्ह्याचा चांगला अभ्यास असल्यामुळे त्यांच्याकडून बीड जिल्ह्याला खूप सारे अपेक्षा आहेत