बीड । प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात आजपासून 45 ते 60 वयोगटातील सर्व व्यक्तींना लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. या अनुषंगाने बीड जिल्ह्यात सुद्धा 121 केंद्रावर लसीकरणास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी लसीकरणास प्रतिसाद मिळाला. परंतु कोरोनाला हरवण्यासाठी या वयोगटातील सर्व नागरिकांनी लसीकरणाचे डोस घ्यावेत व कोरोनाला हरवावे असे मत ‘प्रारंभ’ शी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी.पवार यांनी व्यक्त केले.
यापूर्वी 60 वर्षाच्या पुढील व्यक्तींना लसीकरण देण्यात येत होते. तो टप्पा पूर्ण झाल्यामुळे आता 45 ते 60 या वयोगटातील व्यक्तींना कोरोना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यात एकूण 121 केंद्र उपलब्ध असून यात 54 उपकेंद्र, 51 प्राथमिक आरोग्य केंद्र, 14 ग्रामीण रुग्णालय अशा ठिकाणी वरील वयोगटातील व्यक्तींना सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या जिल्हा आरोग्य विभागाकडे कोविशील्डचे 40 हजार डोस तर कोव्हॅक्सिनचे 4 हजार डोस उपलब्ध आहेत. प्रत्येक आठवड्याला लसीकरण डोस उपलब्ध होतात. कोरोनाला हरवण्यासाठी जिल्ह्यात जिल्हा आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहे. वरील वयोगटातील व्यक्तीने स्वत:हून या लसीकरणास प्रतिसाद द्यावा व कोरोनाच्या या महामारीपासून स्वत:चा, जिल्ह्याचा, राज्याचा व देशाचा बचाव करावा.
चौकट
tजिल्ह्यात 121 लसीकरण केंद्र
tसकाळी 10 ते सायं.6 पर्यंत
t45 ते 60 वयोगटातील सर्वांना लसीकरण
tकोविशील्डचे 40 हजार डोस उपलब्ध
tकोव्हॅक्सिनचे 4 हजार डोस उपलब्ध
tप्रत्येक आठवड्याला जिल्ह्याला व्हॅक्सिनचे डोस मिळतात
tडोससाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक