मोदींनी दहा वर्षात देशवासीयांच्या अपेक्षाभंग केला – खा. डॉ. अमोल कोल्हे
आष्टी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंच्या प्रचार सभेला अलोट गर्दी
बीड / आष्टी : भाजपच्या उमेदवाराचा पराभव दिसू लागल्याने बीड जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित केली जातेय. यातच महविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय स्पष्ट झाला आहे. तर राज्यात महाविकास आघाडीच्या ३० ते ३५ खासदारकीच्या जागा निवडून येणार असून भाजप महायुतीचा पराभव निश्चित असल्याचा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
पूर्वी लोक घरावर दरोडा टाकायचे, पण भाजपवाले आता पक्षावर दरोडा टाकू लागले आहेत. त्यामुळे आता स्वार्थासाठी सरपटत जायचं की स्वाभिमान जपण्यासाठी लढायच हे ठरवा असे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षाच्या काळात देशवासीयांच्या अपेक्षाभंग केला. अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
आष्टी ( जि. बीड ) येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व प्रवक्ते अमोल कोल्हे हे बोलत होते. सभेला उमेदवार बजरंग सोनवणे, पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे, युवा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, जिल्हाध्यक्ष तथा आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार सुनील धांडे, माजी आमदार उषाताई दराडे, सुशीलाताई मोराळे, बबन गीते, परमेश्वर सातपुते, राम खाडे, कॉ. महादेव नागरगोजे, अजिंक्य चांदणे, ॲड हेमा पिंपळे, दीपक केदार, अण्णासाहेब केदार, गणेश कवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, देशात प्रचंड महागाई वाढलेली असून शेतकऱ्यांची सहा हजार रुपयांच्या नावाखाली प्रचंड लूट केली जाते. प्रत्येक बाबीवर जीएसटी द्वारे लूट जात असून गॅस, इंधन व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे महागाईने उच्चांक गाठला असताना मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भाव नाही. हे सरकार व्यापारी आणि भांडवलदार धार्जिणे सरकार आहे. असा आरोप त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जलसिंचनाच्या कामांना मंजुरी दिली. सरकार आल्यास गरीब कुटुंबांमध्ये महिलांना दर वर्षाला एक लाख रूपये दिले जातील. पदवी व पदविका धारकांना वर्षाला एक लाख रुपये देण्याचा उल्लेख जाहीरनाम्यात आहे. तसेच राज्यात जाती निहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्केची मर्यादा वाढवून कुणबी मराठा, धनगर, मुस्लिम व ओबीसी यांना आरक्षण देवू. भाजपचा संविधान बदलण्याचा डाव हाणून पाडा असे आवाहन करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या धास्तीमुळे भाजपला पंतप्रधान यांना बोलावे लागत आहे. यातच बजरंग सोनवणे यांचा विजय निश्चित असून राज्यात महविकस आघाडीच्या ३० ते३५ जागेवर विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
उमेदवार बजरंग सोनवणे म्हणाले की, पालकमंत्री हे सरपंचांना निधीच्या नावाखाली धमकावत आहेत, त्याचा मी निषेध व्यक्त करतो. तर एका उमेदवाराला त्याचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवाराने धमक्या दिल्याच्या क्लिप व्हायला झाल्या आहेत. त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार आहे. तसेच बजरंग सोनवणे हे शेतकरीपुत्र आहेत. जिल्ह्यातील जनताच नेत्यांचे प्रारब्ध ठरविते. नेते जरी एका बाजूला असले तरी सामान्य मतदार आमच्या बाजूने आहेत. ही निवडणूक नेत्यांनी नव्हे तर जनतेनी हातात घेतली आहे. त्यामुळे विजय निश्चित असून निवडून आल्यास मराठा, धनगर, मुस्लिम, ओबीसी आरक्षणासाठी खंबीरपणे सोबत राहून संसदेत आवाज उठविन. कायम संविधानाच्या रक्षणासाठी लढेन अशी ग्वाही बजरंग सोनवणे यांनी दिली.
महेबुब शेख यांनी राज्यात आमचे सरकार येणार असून अधिकारी वर्गाने याचा विचार करावा अशी तंबी दिली. सभेला आष्टी मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मतदारांची अलोट गर्दी झाली होती.
लाव रे ती क्लिप
लाव रे ती क्लिप असे म्हणत जयंत पाटील यांनी सभेत भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी त्यांचा फंड खर्च न केल्याची ऑडियो क्लिप ऐकविली.