अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार – शैलेश कांबळे
अंबाजोगाई प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभा उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ दि. 03 मे 2024 अंबाजोगाई शहराततील मोढा मार्केट मैदान या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता प्रचार सभा होत आहे. त्या निमित्ताने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक पार पडली, या बैठकीमध्ये गाव, तांडा, वाडी वस्ती मधील जास्तीत जास्त लोक, अंबाजोगाईतील सभेला कशा पद्धतीने उपस्थित राहतील यासाठी नियोजन करण्यात आले. रेकॉर्ड ब्रेक करणारी ही सभा घेण्यात येईल असा निर्धार व माहिती उपस्थित सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या बैठकीत बोलताना सांगीतले त्यामध्ये उमेदवार अशोक हिंगे पाटील सह पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे,मिलिंद घाडगे, धम्मनंद साळवे,अंकुश जाधव,अजय सरवदे पुरुषोत्तम वीर, बालाजी जगतकर, धम्मनंद कासारे ,चंद्रकांत खरात,सचिन उजगरे,अनिल डोंगरे,बालासाहेब जगतकर, बाबुराव मस्के,अरुण बनसोडे,शेख खाजाभाई,डॉ.संजय नाकलगावकर,गोविंद मस्के,गौतम साळवे,गफार शाह,अनिल कांबळे,अमोल हातागळे,अविनाश झोडगे,बाबासहेब मस्के,प्रेम जगतकर,रवी सिरसठ,मारूती सरवदे,राम सरवदे,रामभाऊ उदमले व सर्व तालुक्यात व शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.

















