बीड:- देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मराठवाडा प्रदेशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मराठवाड्यातील ७० निजामकालीन पोलिस ठाण्यांच्या ईमारती नविन बांधण्याची घोषणा केली होती.मात्र निजामकालीन पोलिस ठाण्याच्या ईमारती कालबाह्य झाल्या असुन वापरण्यास योग्य नसल्याने नेकनुर पोलिस सारख्या ठिकाणी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पत्र्याच्या शेडमध्ये काम करावे लागत असुन सुधीर मुनगंटीवार यांच्या घोषणेचं नेमकं काय झालं असा सवाल डॉ.गणेश ढवळे यांनी केला असुन
नेकनुर पोलिस ठाण्याची निजामकालीन ईमारत कालबाह्य झाली असुन पोलिस वसाहत पाडुन वर्षभरापेक्षा जास्त कालावधी झाला असुन सन २०२१-२२ मध्ये जवळपास ६ कोटी ३४ लाख निधी मंजूर होऊनही अद्याप ईमारत बांधकामाला मुहूर्त मिळाला नसुन सध्याची ईमारत पोलिस ठाण्यासाठी अपुरी पडत असुन गैरसोय होत असल्याने आधिका-यांना पत्र्याच्या शेडमध्ये काम करावे लागत आहे.तसेच पोलिस वसाहत वर्षभरापूर्वी पाडली असुन अद्याप बांधकाम सुरू नसुन कर्मचाऱ्यांना किरायाच्या घरात रहावे लागत असुन तातडीने पोलिस ठाणे ईमारत व पोलीस वसाहत बांधकाम सुरू करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्यासह शेख युनुस,सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार यांनी पोलिस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना केली आहे.
ईमारती अभावी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पत्र्याच्या शेडमधुन कामकाज करावे लागते
नेकनुर येथील पोलिस ठाण्याची इमारत निजाम कालीन असुन येथील ईमारत व वसाहत वापरण्यास व राहण्यास योग्य नसल्याने मध्यंतरी नविन ईमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.यासाठी २०२१-२२ मध्ये जवळपास ६ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. येथील पोलिस ठाणे अंतर्गत जवळपास ८१ गावांचा कारभार चालतो.यामध्ये नेकनुर, चौसाळा लिंबागणेश,मांजरसुंभा ,येळंब यासारखी मोठी गावे येतात.
याठिकाणी ४ अधिकारी आणि ४० कर्मचारी कार्यरत आहेत.पोलिस स्टेशनसाठी प्रशस्त जागा असुन आणि शासनाकडून निधी मंजूर होऊन वर्ष उलटूनही बांधकामास सुरुवात नाही. पोलिस स्टेशनची इमारत वापरण्यास कालबाह्य झाली असुन ती सध्या अपुरी पडत असल्याने आधिका-यांना काम करण्यास पत्र्याचे शेड
तयार करण्यात आले आहे.पोलिस स्टेशनचा आवाका व कारभार मोठा असल्याने याठिकाणी घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या मोठी असते.पोलिस स्टेशनची ईमारत छोटी असल्याने पोलिसांना काम करण्यास अडचणी निर्माण होतात.पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना आपले कर्तव्य बजावताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे शासनाने पोलिस ठाण्याची ईमारत तातडीने बांधण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पोलिस वसाहत पाडुन वर्षं उलटुनही बांधकामास सुरुवात नाही; अधिकारी, कर्मचारी किरायाच्या घरात
नेकनुर पोलिस ठाणे अंतर्गत ४ अधिकारी आणि ४० कर्मचारी कार्यरत आहेत.याठिकाणी पोलिसांना राहण्यासाठी घरे देखील होती.परंतु येथील वसाहत
राहण्यास व वापरण्यास योग्य नसल्याने नविन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानंतर येथील वसाहत पाडुन वर्षभरापेक्षा जास्त कालावधी उलटूनही अद्याप बांधकामाला सुरुवात नाही त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना किरायाच्या घरात रहावे लागत आहे.