महिलांमध्ये नवदुर्गांचे रूप – राजश्रीताई
परळीत इतका सुंदर कार्यक्रम पाहून आनंद वाटला – अभिनेत्री मानसी नाईक
नाथ प्रतिष्ठाण आयोजित दांडिया महोत्सवास परळीकर महिलांचा उदंड प्रतिसाद
दांडियाचा महिलांनी घेतला मनसोक्त आनंद
परळी वैद्यनाथ – महिलांना आदी शक्तीचा दर्जा आपण देतो, मात्र सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना महिलांना आपले छंद, हौस-मौज याचे कायम बलिदान द्यावे लागते. त्यातच वेळ काढायचा म्हटलं तर सुरक्षित सुविधा मिळत नाहीत. याचाच विचार करून ना.धनंजय मुंडे यांनी यावर्षी नवरात्री उत्सवात या भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन केले असून, पुण्या-मुंबई सारखा सोहळा परळीत शक्य करून दाखवला आहे, असे मत सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे यांनी परळीतील दांडिया महोत्सवात बोलताना व्यक्त केले.
यावेळी आदिशक्तीच्या नऊ रूपांचे स्मरण करून सौ.राजश्रीताई यांनी प्रत्येकच महिलेमध्ये नवदुर्गांचे रूप असून, त्याला जागृत ठेवायची आवश्यकता आहे, असेही यावेळी राजश्रीताई म्हणाल्या.
ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण मार्फत परळी शहरातील विद्यानागर भागात महिलांसाठी भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, आज या कार्यक्रमास सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली. त्याचबरोबर प्रसिद्ध सिनेअभिनेत्री मानसी नाईक याही उपस्थित होत्या.
आपण प्रत्येक वेळी गणेश महोत्सवात परळीत येत असतो, दांडिया महोत्सवासाठी परळीत प्रथमच आले आहे, याठिकाणचे उत्कृष्ट नियोजन पाहून आनंद वाटला, असे मत मानसी नाईक यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे, सौ.मनीषाताई अजय मुंडे, सौ.अक्षताताई सुशील कराड, सौ.प्राजक्ताताई श्रीकृष्ण (भाऊड्या) कराड, सौ.अर्चनाताई रोडे, सौ.वर्षाताई दहिफळे त्याचबरोबर प्रसिद्ध गायिका श्रावणी महाजन, गायक रवींद्र खोमणे यांसह आदी उपस्थित होते.
आज दांडिया महोत्सवास परळीतल्या महिला भगिनी, तरुणी यांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. एवढेच नाही तर स्वतः सौ.राजश्रीताई मुंडे, मानसी नाईक यांसह सर्वच महिलांनी दांडियावर ठेका धरला. महिलांमधील उत्साह पाहून उद्या (दि.21) यापेक्षा जास्त महिला उपस्थित राहतील. शनिवारी (दि.21) सायंकाळी राजश्रीताई यांच्यासह सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या दांडिया साठी उपस्थित राहणार आहेत.