महिलांमध्ये रंगणार ‘होम मिनिस्टर’चा खेळ; स्कुटीसह अनेक बक्षिसे
परळी वैद्यनाथ – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ‘नाथ प्रतिष्ठाण’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून तसेच ज्येष्ठ नेते वाल्मीक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरातील विद्यानगर भागात नाथ प्रतिष्ठाण आयोजित भव्य दांडिया महोत्सव महिलांसाठी सुरू असून शुक्रवारपासून या कार्यक्रमात आणखीनच रंगत येणार आहे!
शुक्रवारपासून या कार्यक्रमात सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे यांची विशेष उपस्थिती असणार असून त्या दांडिया महोत्सव तसेच होम मिनिस्टर आदी सर्वच कार्यक्रमांना पूर्णवेळ उपस्थित राहणार असल्याची माहिती सौ. प्राजक्ता श्रीकृष्ण (भाऊड्या) कराड यांनी दिली आहे.
दांडिया महोत्सवासाठी शुक्रवारपासून सिने सृष्टीतील खास सेलिब्रेटींची उपस्थिती राहणार असून, शुक्रवारी (दि. 20) प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक या उपस्थित राहतील, तसेच शनिवारी (दि. 21) प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तर रविवारी (दि.22) रोजी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सोमवारी (दि.23) रोजी अभिनेत्री रुपाली भोसले व अभिनेता/ निवेदक संकर्षण कऱ्हाडे यांची उपस्थिती राहणार आहे.
दांडिया महोत्सवात संगीताचे रंग भरण्यासाठी श्रावणी महाजन, रवी खोमणे, कल्याणी देशपांडे, सुजित सुमन, सावनी रवींद्र, मुनावर अली यांच्या सुरेल गीतांची मैफिलही रंगणार आहे.
दरम्यान दांडिया महोत्सवाबरोबरच महिलांमध्ये ‘होम मिनिस्टर’ ही खास स्पर्धा देखील आयोजित केली जाणार असून, विजेत्या महिलांना स्कुटी, फ्रीज, वॉशिंग मशीन, यांसह कौटुंबिक उपयोगाच्या विविध वस्तू भेट म्हणून दिल्या जाणार आहेत. होम मिनिस्टर स्पर्धेचे निवेदन प्रसिद्ध कलाकार व निवेदिका शोभा कुलकर्णी या करणार आहेत.
तरी परळी वैद्यनाथ नगरीतील व परिसरतील महिला, माता-भगिनींनी, युवतींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुनिय करावा, असे आवाहन नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.