बीड : एशियन गेम्स मध्ये बीडच्या अविनाश साबळेने 300 मीटर ट्रिपल चेस मध्ये सुवर्णपदक पटकावले.
चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा स्टार अॅथलीट अविनाश साबळे याने भारताला मोठे यश मिळवून दिले आहे. त्याने स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
अविनाशने ३००- मीटर स्टीपलचेस स्पर्धेत ही कामगिरी केली आहे. अविनाश साबळे हा मुळचा बीडचा रहिवाशी आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे आजचे १ ऑक्टोबर चे दुसरे सुवर्णपदक आहे. या यशाबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी साबळे यांचे अभिनंदन केले. तसेच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. बीड विनाश साबळे च्या या यशाचे जल्लोषात स्वागत केले. जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख यांनी अविनाशच्या यशाबद्दल अभिनंदन केले.