बीड – ग्रामीण आरोग्यसेवा सक्षम असल्यास गोरगरिब रुग्णांना याचा फायदा होता यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण आरोग्यसेवा कणखर व्हाव्यात या उदेशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांच्याकडून आष्टी, पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयांना भेटी देत रुग्ण व रुग्णालयाची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर आलेल्या रुग्णांना दर्जेदार उपचार सेवा मिळावी यासाठी काम करण्याच्या सुचना दिल्या.
शासनाकडून संपूर्ण आरोग्यसेवा मोफत करण्यात आली आहे. याचा फायदा गोरगरिब रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार सेवेतून मिळाला पाहिजे यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण काम करत आहे. शनिवारी आष्टी, पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयांना जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून भेट देत रुग्णांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी येथील अधिकारी कर्मचार्यांना आलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार सेवा मिळवून देण्याच्या सुचना केल्या. ग्रामीण जनतेला वेळेवर आहे त्याठिकाणी उपचार मिळाल्यास रुग्णांकडून समाधान व्यक्त केला जातो. यावेळी त्यांच्या सोबत पाटोदा वैद्यकीय अधिकारी डॉ. सदाशिव राऊत, आष्टी वैद्यकीय अधिकारी डॉ.राहूल टेकाळे या बरोबर डॉक्टर, नर्स, सह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णसेवेसाठी कायम सक्षम राहा
खेड्यापाड्यातील नागरिकांना वेळेवर आरोग्यसेवा कशी मिळेल यासाठी येथील कर्मचारी अधिकारी काम करावे. त्याचबरोबर वंचित घटनकांना सक्षम आरोग्यसेवा देण्यासाठी डॉक्टर आणि कर्मचारी काम करण्याच्या सुचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांनी यावेळी सांगितले.