बीड शहरातील सुजान नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ……शहर शिवसंग्रामच्या वतीने आवाहन
बीड : लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांच्या साठाव्या जयंतीनिमित्त आज शिवसंग्राम भवन,नगर रोड, बीड येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या निमित्ताने आयोजित नियोजन बैठकीत बीड शहरातील सुजान नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन शहर शिवसंग्रामच्या वतीने करण्यात येत आहे.
30 जून रोजी लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांची “षष्ठब्दी ” जयंती साजरी होत आहे . या जयंतीनिमित्त गरजू रुग्णांना, महिलांना तथा सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी शिवसंग्रामच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे,समाजसुधारकाची जयंती वा पुण्यतिथी ही सामाजिक उपक्रमाने साजरी केली जावी जेणेकरून वंचित उपेक्षित गरिबांना याचा लाभ होतो व नकळत त्यांचे प्रश्न सुटत असतात हा लोकनेते मेटे साहेबांचा सामाजिक व वैचारिक वारसा शिवसंग्राम सक्षमपणे चालवताना दिसत आहे.त्याचाच एक भाग म्हणून येत्या 30 जुन रोजी लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांची 60 वी जयंती निमित्ताने उद्या शिवसंग्राम भवन,नगर रोड,बीड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांची 60 वी जयंती निमित्ताने बीड शहरात विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.त्या अनुषंगाने काल शिवसंग्राम भवन येथे शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.येत्या 27 जुन रोजी शहर स्वच्छता अभियान व 28 जुन रोजी बीड शहरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आलेले आहे.विविध समाजोपयोगी उपक्रमाने लोकनेते मेटे साहेबांची जयंती साजरी होणार असून बीड शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले
या बैठकीस युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैया मेटे,सुहास पाटील,शहराध्यक्ष ऍड.राहुल मस्के,शहर उपाध्यक्ष शेषराव तांबे,शहर सचिव गोपीनाथ देशपांडे,माजी नगरसेवक दत्ता गायकवाड,अल्पसंख्यांक आघाडीचे ज्येष्ठ नेते शेख शकील भाई,शेख लालाभाई,शेख अजहर भाई,नितीन आगवान,हरिश्चंद्र ठोसर,महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ऍड.पूजाताई शहाणे, शहर उपाध्यक्षा संगीताताई ठोसर व अन्य शिवसंग्राम पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.