बीड : दोषसिध्दी प्रमाणाचे फार दुरोगामी परिणाम समाजव्यवस्थेवर पडत असतात सर्वसामान्यांना कायद्याचे संरक्षण असल्याची भावना वृध्दीगत करण्यासाठी, गुन्हेगारांना कायद्याचा जरब बसविण्यसाठी व कायदेपालनाचा सकारात्मक संदेश समाजव्यवस्थेत रूढ करण्यासाठी गुन्ह्यांमधील दोषसिध्दी एक महत्वाचे साधन आहे. सबब मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या संकल्पनेतून बीड जिल्ह्यात गत पाच वर्षाच्या कालवधीत दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्यात योगदान दिलेल्या पोलीस अधिकारी / अंमलदार आणि शासकीय अभियोक्ता यांचा गौरव सोहळा मा. जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथील सभागृहात आज दि. 23/06/2023 रोजी आयोजीत करण्यात आला होता.
आयोजीत गौरव सोहळ्यास (63) तपासीक अधिकारी, ( 23 ) शासकीय अभियोक्ता व (19) पैरवी अधिकारी / अंमलदार यांना त्यांनी दोषसिध्दी वाढीकरीता बजावलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडून प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे. गौरव सोहळ्यास पोलीस अधीक्षक, बीड तसेच अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई आणि जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. आयोजीत सोहळ्यात मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी उपस्थित सर्व अधिकारी व अंमलदार यांना पुढील वाटचालीकरीता अमुल्य मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या आहेत.