संतोष साहनी यांचा सेवेचा उपक्रम कौतूकास्पद-पोलीस अधीक्षक
बीड । प्रतिनिधी
तालुक्यातील पाली येथे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा म्हणून अन्नछत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन व्यापारी महासंघ व पाली ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे. शनिवारी (दि.17) पायी दिंडीत जाणाऱ्या महिलांना व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी यांच्या पुढाकारातून साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मनोत व्यक्त करताना पोलीस अधीक्षक म्हणाले की, व्यापारी महासंघाचे व पाली ग्रामस्थांचे यांचे कार्य खरेच कौतूकास्पद असून त्यांनी दिंडीतील वारकऱ्याला व व्यापारी महासंघाला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित क्षेत्र नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज, मोरेश्वर संस्थान कोळवाडीचे हरिहर महाराज, दिंडी प्रमुख गणेश मगर महाराज, सुभाषअप्पा काटकर महाराज, संत सेना महाराज दिंडीचे राजाभाऊ पंडित महाराज, बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, मुख्याधिकारी निता अंधारे, व्यापारी महासंघाचे संतोष सोहनी, विनोद पिंगळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर मोकाटे, उपअधीक्षक संतोष वाळके,
बीड ग्रामीणचे निरीक्षक संतोष साबळे, आरोग्य विभागाच्या श्रीमती पवार, चंद्रसेन नवले, रामेश्वर कासट, रामबिलास सोहनी, पत्रकार बालाजी मारगुडे, दिनेश लिंबेकर, जालिंदर धांडे, केशव कदम आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश सोहनी यांनी केले तर आभार राजस्थानी सेवा समाजाचे सचिव रामेश्वर कासट यांनी मानले. तसेच 80 वारकऱ्यांना 80 वॉटर फिल्टर ॲड.जगदीश जाजू, सीए राहुल जाजु, अतुल जाजु यांच्यावतीने वारकऱ्यांना 80 वॉटर फिल्टर देण्यात आले. यासह गेल्या पाच वर्षापासून व्यापारी महसंघाच्या व पाली ग्रामस्थांच्या वतीने विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या असंख्य वारकऱ्यांना पाली परिसरात नागनाथ देवस्थान येथे जेवणाची, राहण्याची व नाष्ताची सोय करण्यात येते. यासह आरोग्य विभागाच्या वतीने याठिकाणी वारकऱ्यांची सेवा घडावी या अनुषंगाने त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात येते. खरोखरच व्यापारी महासंघाचा व पाली ग्रामस्थांच्या या उपक्रमामुळे अनेक वारकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे.