बीड : जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुंडगिरीचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन MPDA कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर MPDA कायदयाअंतर्गत कार्यवाही करण्याचे योजिले आहे. या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक, बीड यांचे सुचनेवरुन पोलीस निरीक्षक श्री. केतन राठोड पोलीस ठाणे शिवाजीनगर, बीड यांनी दिनांक 04/03/2023 रोजी इसम नामे सुधिर हनुमंत ऊर्फ हनुमान वाघमारे रा. अंबिका चौक, पांगरी रोड, बीड ता. जि. बीड याचे विरुद्ध MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी साहेब बीड यांना सादर केला होता.
सदर स्थानबध्द इसमा विरुध्द पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे दुखापत करणे, घराविषयी आगळीक करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, अवैद्यशस्त्र बाळगणे, विनयभंग करणे, खंडणी मागणे, रस्ता आडविणे, जिवे मारण्याची धमक्या देणे, शिवीगाळ करणे वगैरे स्वरुपाचे 07 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्यापैकी 05 गुन्हे न्यायप्रविष्ट असून 02 गुन्हे पोलीस तपासावर आहेत. सदरील इसम हा शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे करत असल्याने पोलीसांची त्याचेवर बऱ्याच दिवसांपासुन करडी नजर होती. सदर इसमावर यापुर्वी CrPC 107 प्रमाणे 02 प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा चढत्या क्रमाने गुन्हे करण्याचे चालुच ठेवुन होता. त्याची शिवाजीनगर हद्दीत व बीड शहरात दहशत आहे. त्याचे विरुध्द लोक फिर्याद देण्यास अथवा साक्ष देण्यास समोर येत नाहीत. तो शस्त्रासह फिरतो व सर्वसामान्य लोकांना त्रास देवुन दहशत निर्माण करतो.
सदर प्रकरणात श्रीमती. दिपा मुधोळ / मुंडे, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिनांक 25.04.2023 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम. पी.डी.ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्सुल कारागृह औरंगाबाद येथे हजर करून स्थानबध करणे बाबत त्यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र. 2023/ आरबी डेस्क- 1/पोल-1/ एम.पी.डी.ए 05 दिनांक 25.04.2023 अन्वये आदेश पारीत केले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना पो. नि. श्री. केतन राठोड पो.स्टे. शिवाजीनगर व श्री. सतिष वाघ पो. नि. स्थागुशा बीड यांना दिल्या होत्या. यांनी संयुक्तरित्या गोपनिय खबऱ्याचे आधारे सदर स्थानबद्ध इसमास दि. 25.04.2023 रोजी 19:45 वा. ताब्यात घेवुन पोलीस ठाणे शिवाजीनगर, बीड येथे हजर केले व त्यानंतर योग्य पोलीस बंदोबस्तात हर्सुल कारागृह, औरंगाबाद येथे दिनांक 26.04.2023 रोजी 03:00 वा. हजर करुन स्थानबध्द केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक बीड श्री सचिन पांडकर, उपविपोअ बीड श्री. संतोष वाळके, पो.नि. श्री. सतीष वाघ, स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि केतन राठोड, पोउपिन पाथरकर, पोह परझने, सारणीकर, पोह अभिमन्यु औताडे, शेख नसीर, वाघ स्थागुशा बीड यांनी केलेली आहे. भविष्यातही वाळुचा चोरटा व्यापार करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांचेवर व दादागिरी करणाऱ्या व खंडणी बहाद्दर धोकादायक गुंडावर जास्तीत जास्त MPDA कायदयाअंतर्गत कटोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर यांनी दिले आहेत.