बीड, अंबाजोगाई, माजलगाव, आष्टी या तालुक्यात जास्त रुग्ण
बीड । प्रतिनिधी
जिल्ह्यामध्ये आज लॉकडाऊनचा पहिला दिवस असून सर्वत्र बंद असले तरी मात्र जिल्ह्यामध्ये कोरोना थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आज जिल्ह्यात तब्बल 383 रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढताना दिसत आहे.
आज दुपारी आरोग्य विभागाकडून 2605 अहवालाचा रिपोर्ट प्राप्त झाला. यात 2222 रुग्ण निगेटिव्ह आले तर 383 रुग्ण पॉझीटिव्ह आले. हा आकडा चालू वर्षातील सर्वात जास्त असून जिल्ह्यात आकडा कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. आज वाढलेल्या रुग्णामध्ये बीड-119, अंबाजोगाई-100, आष्टी-30, गेवराई-21, धारूर-10, केज-28, माजलगाव-27, परळी-33, पाटोदा-9, वडवणी-6 असे रुग्ण आढळले.
जिल्हा लॉकडाऊन केला तरी जिल्ह्यात कोरोना लॉकडाऊन होताना दिसत नाही. यामुळे सध्या सुरू असलेले लॉकडाऊन कितपत कोरोनाची साखळी तोडण्यास सक्षम राहील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासनासह सर्वांनीच या लढाईत सहभागी होवून कोविड नियमांचे पालन करत कोरोनाला हरवण्याची गरज आहे.