डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धेचे उद्घाटन
गेवराई प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती बीड यांच्या वतीने संपूर्ण बीड जिल्ह्यात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून गेवराई येथील र.भ.अट्टल महाविद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन युवानेते रणवीर पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲड. सुभाष निकम, अक्षय पवार, भारत मगर, डॉ.नामदेव शिनगारे, किशोर सोनवणे, नागनाथ घसिंग, आकाश आडे, प्रा.रामहरी काकडे, सौ.रंजना सोनवणे आदी मान्यवर उपस्थिती होते.
आपल्या भाषणात बोलताना रणवीर पंडित म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समितीने सामान्य ज्ञान स्पर्धा सारखा चांगला उपक्रम जिल्हाभर राबवला आहे. बीड जयंती उत्सव समितीने राबवलेला हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र भर राबलवला जावा असेही ते म्हणाले.
या स्पर्धेत एकूण ३५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेला शिक्षक, पालक व सहभागी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. प्रतिक सदाफुले,अक्षय बोराडे , निखिल कांबळे , रोहन मगर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.शरद सदाफुले यांनी केले तर आभार भारत मगर यांनी मानले.