बीड प्रतिनिधी – माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत बीड शहरातील एकूण 15 रस्त्यांना मंजुरी मिळालेली आहे. त्यापैकी एक असलेल्या जुना मोंढा भागातील सिमेंट काँक्रेट रस्ता गुरुवार दि. 16 मार्च पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.
सदरील रस्ता काम हे मागील तीन महिन्यांपासून सुरू होते. जुना मोंढा भागातील व्यापारी बांधव व नागरिकांच्या सहकार्यामुळे रेकॉर्ड वेळेत हे रस्ता काम पूर्ण करण्यात आले. लवकरात लवकर सदरील रस्ता काम पूर्ण करून व्यापारी बांधवांना व्यापारासाठी व परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी जास्त अडचण येणार नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अमर नाईकवाडे यांनी पूर्णवेळ या रस्ता कामावर थांबून रस्ता काम गुणवत्ता पूर्ण व कमी वेळेत पूर्ण करून घेतले. रस्ता खुला झाल्यामुळे जुना मोंढा परिसरातील व्यापारी बांधव व नागरिकांनी माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर व नगरसेवक अमर नाईकवाडे यांचे आभार मानून आनंद व समाधान व्यक्त केले.
सदरील रस्ता वाहतुकीसाठी खुला करतेवेळी दै. पार्श्वभूमीचे संपादक गंमत भाऊ भंडारी, गटनेते फारुख पटेल, अमर नाईकवाडे, गंगाभीषणजी करवा, केदारजी झंवर, भागीरथ दादा चरखा, बद्रीनारायणजी मानधने, विनोद पिंगळे, निलेशजी लोढा, अजितजी छाजेड, बबनराव लहाने, गोपालजी अग्रवाल, मुकेश अग्रवाल, सुदर्शन लाहोटी, निलेश खिवंसरा, भैय्यासाहेब पवळे, रामदास सरवदे, बंडू काळे, शेख सलमान आदी. परिसरातील व्यापारी बांधव व नागरिक उपस्थित होते.
शहरातील इतर रस्ता कामे गुणवत्ता पूर्ण करून घेणार- पटेल, नाईकवाडे
नगरोत्थान, दलित वस्ती, दलितेत्तर, वैशिष्ट्यपूर्ण यासह इतर योजनांमधून बीड शहरात सुरू असलेली व सुरू होणारी कामे पूर्ण वेळ देऊन गुणवत्ता पूर्ण करून घेणार असल्याचे यावेळी गटनेते फारुख पटेल व नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी म्हटले आहे.