अमृत अभियान अंतर्गत पाणी पुरवठा व भुयारी गटार योजना
आदी समस्या बाबत आ.संदीप क्षीरसागरांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उठवला आवाज

मुंबई प्रतिनिधी :- आ.संदीप क्षीरसागरांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज बीड मतदार संघातील विविध मुद्यांना हात घालत मा.अध्यक्षांच्या मार्फत राज्य शासनाला प्रश्नावली उपस्थित केली. त्यामध्ये बीड शहरात बिंदुसरा नदीवर बंधारा कम पुल तसेच अमृत अभियान अंतर्गत भुयारी गटार योजना व पाणी पुरवठा योजना, टुकुर प्रकल्प, एमआयडीसी भागात पोलीस चौकी, नशाधीन होत चाललेल्या तरूणांना वाचविण्यासाठी उपाय योजने बाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, बिंदुसरा नदीवरील बीड शहरासाठी पाणी पुरवठा करणेकरिता निम्न पातळी बंधारा करणे बाबत कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभाग महामंडळ,औरंगाबाद यांना उपसचिव,महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांनी दि.10.11.2021 रोजी मान्यतेसह आदेशीत केलेली आहे. बीड शहरातून बिंदुसरा नदी निम्नपातळी बंधारा कम पुल करणे बाबत सदरील कामाचे सर्वेक्षण होवून रितसर प्रस्ताव व संकल्पन प्रस्ताव मध्यवर्ती चित्र संघटना नाशिक यांच्याकडून सादर होवून तो प्रस्ताव यथोचित मान्य करण्यात आलेला आहे. बिंदुसरा नदीवरील निम्न पातळी बंधारा या योजनेसाठी 95 टक्के विश्वासर्हतेने 3.23 दलघमी येवा उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र आहे. तसेच या प्रकल्पास आवश्यक 0.35 दलघमी पाणी वापरामुळे कोणताही परिणाम दिसून येत नाही. तरी, मध्य गोदावरी खोर्या लवादानुसार पाणी वापर सुत्रानुसार प्रत्यक्ष पाणी वापर परगणित केल्यानुसार उपलब्ध होणार्या मंजुर 2.80 अब्ज घनफुट (ढचउ) शिल्लक पाण्यामधुन या बंधार्या करिता विशेेष बाब म्हणुन सिंचनासाठी 0.35 दलघमी पाणी वापर प्रस्तावित केलेला आहे. तरी,सदरील योजनेसाठी सर्व विचार पाहता प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धता व्हावी. जेणेकरून येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल व पुलकम बंधारा असल्यामुळे शहरातील त्या भागातील नागरिकांची जाण्या-येण्याची सोय होईल. तसेच टूकुर (खांडेपारगाव) साठवण तलाव प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश 2003 ला झालेला आहे. त्यावेळेस त्या प्रकल्पाची किंमत भुसंपादनासह 16 कोटी रूपये होती. आज ती किंमत 350 कोटी रूपयाच्या दरम्यान आहे. टुकुर प्रकल्पास होत असलेल्या विरोधामुळे ऑगस्ट 2021 ला साठवण तलावाच्या ऐवजी को.प.ब. बंधारे घेणे बाबत सुचित केले. एकूण नऊ बंधारे या प्रकल्पाऐवजी होत आहेत. बंधार्याचा पाणीसाठा 1.74 दलघमी होत आहे. सिंचन क्षेत्र 390 हेक्टर होणार आहे व त्यासाठी 220 कोटी रूपये लागत आहेत. नाळवंडी 1, खांडेपारगाव 2, अंथरवणप्रिंपी 1, उमरी 1, उमरद 1, नागापुर 1, बर्हाणपुर 1, भाटसांगवी 1 याप्रमाणे एकूण 9 बंधारे बांधण्यात यावे हा प्रश्न उपस्थित केला. तसेच टुकुर प्रकल्पासाठी नाशिक कार्यालयाकडून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र व शासनस्तरावरून प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर द्यावी जेणेकरून सदरील परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूप सुटेल. तसेच बीड अमृत योजनेची कामे अंतिम टप्प्यात आहेत. बीड नगर परिषदेला जोपर्यंत महावितरणकडून अधिकचा विद्युत भार मंजूर होत नाही. तोपर्यंत आपल्याला पूर्ण क्षमतेने बीड शहरात पाणीपुरवठा करणे अडचणीचे जात आहे. सध्याचे मंजूर अधिभारानुसार फक्त 10 दलघमी पाणी वाढत आहे. सध्या बीड शहराला 49 दलघमीची गरज आहे. 49 ऐवजी 30 ते 32 दलघमी पाणी उपलब्ध होत आहे. अतिरिक्त विद्युतभार मंजूर होणे बाबत आदेशीत व्हावे अशी मागणी यावेळी केली व विद्युत व्यवस्था होणे बाबत लोड एक्सटेंशनचा प्रस्ताव अधिक्षक अभियंता,महावितरण यांच्याकडे दाखल आहे. माजलगाव धरणावर सध्या 500 के.व्ही.चे रोहित्र उपलब्ध आहे. तेथे 1600 के.व्ही.चे रोहित्र आवश्यक आहे. तसेच डब्ल्युडीपी जलशुद्धीकरण केंद्र, ईट येथे 630 के.व्ही.चे रोहित्र उपलब्ध आहे. तेथे 1600 के.व्ही.चे रोहित्र आवश्यक आहे. असे झाल्यास 500 एच.पी.चे चार पंप चालू होतील व बीड शहराला 49 द.ल.घ.मी. पाणी पुरवठा चालू होईल. बीड शहरातील अमृत अभियान अंतर्गत भुयारी गटार योजनेचे काम मे.इंद्रायणी कन्स्ट्रक्शन व केआयपीएल कंपनीला दि.19.07.2018 रोजी देण्यात आलेले आहे. त्याची एकूण किंमत 165 कोटी 80 लक्ष रूपये असून नगर परिषद,बीडने काम मंजुर होत असतांना एसटीपी प्लांटसाठी जागा उपलब्ध आहे असे लेखी दिले व नंतर ती जागा या कामासाठी व दोन वेटवेलसाठी ही जागा उपलब्ध नाही. एकूण कामाची भौतिक प्रगती 10.79% झालेली आहे. नगर पालिका, बीड, एमजीपी व कंत्राटदार यांनी गेल्या तीन वर्षापासून या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष केलेले आहे. शासनाच्या एका चांगल्या योजनेकडे प्रशासनाने व कंत्राटदाराने पुर्ण न केल्यामुळे बीड शहरातील विकास कामांसाठी अडचण ठरत आहे. तरी पहिल्या टप्प्यामध्ये जी कामे मंजुर झालेली आहेत ती कामे तात्काळ विना विलंब चालू करण्यासाठी आपल्यास्तरावरून आदेशीत व्हावे व माझ्या मतदार संघातील या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. सदरील दोन्ही योजना पुर्णत्वाकडे गेल्या असून फक्त बीड नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे या योजनेपासून शहरातील नागरिक वंचित आहेत. या संदर्भात मी मागच्या अधिवेशनात सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या त्यांच्या दालनामध्ये बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते पण हे आश्वासन आत्तापर्यंत पुर्ण झालेले नाही. बीड शहरातील एमआयडीसी भागामध्ये आणि जुना मोंढा व नवीन मार्केट कमिटी येथे मोठ्या प्रमाणावर व्यापार्यांचे दुकान असून व्यापारी वर्ग रात्री बेरात्री या मार्गावरून सातत्याने रहदारी करत आहेत. या मार्गावर अनेक वेळा वाटमारी सारख्या गंभीर घटना घडलेल्या आहेत. व्यापार्यांची माझ्याकडे गेल्या अनेक वर्षापासून या भागात पोलीस चौकी करण्याची मागणी असून त्याकरिता गृह विभागाने प्रस्ताव तात्काळ मागवुन त्यास तातडीने मान्यता द्यावी. शिवाजीनगर पोलीस स्टेशन बांधकामासाठी प्रस्ताव तयार आहे. जागा पण शिवाजीनगर पोलीस स्टेशनला उपलब्ध आहे अध्यक्ष होते आणि पोलीस हाऊससिंग डिपार्टमेंटचा पूर्ण इस्टिमेट सुद्धा सादर केलेले यासंदर्भात लवकरात लवकर जर मला निधी उपलब्ध झाला तो प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल. तसेच बीड शहरामध्ये व मतदार संघात अघोरी नशेचे प्रकार घडत असून मेडिकल स्टोअर अत्यल्प दरात नशेचे औषधे लहान मुलासह तरूण वर्ग घेत असून त्यामुळे त्यांचे पालकांना अत्यंत काळजी निर्माण झाली असून ते सातत्याने माझ्याकडे या बाबत तक्रारी घेवून येत आहेत. हा मुद्दा सभागृहातील अनेक आमदारांनी उपस्थित केला असून तरूण पिढी नशाधीन होवून गुन्हेगारी प्रमाणात देखिल वाढ होत असून नशाधीन होत चाललेल्या भावी पिढीला वाचवावे. मा.अध्यक्ष महोदय यांनी यावर तातडीने उपाय योजना व कठोर नियमावली करणेसाठी संबंधित विभागाला सूचना कराव्यात व मतदार संघातील उपरोक्त महत्त्वाच्या प्रश्न मार्गी लावावे अशी अध्यक्षांच्या मार्फत राज्य शासनाकडे आ.संदीप क्षीरसागर यांनी मागणी केली आहे.