जिल्हाधिकारी महोदय आपण बीड जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढीसाठी विशेष पुढाकार घ्याच!
बीड जिल्ह्यात 2.40% वनक्षेत्र
बीड जिल्ह्यात वनक्षेत्र वाढवण्यास वन विभाग अपयशी
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यामध्ये वनक्षेत्राचा जर अभ्यास केला तर बीड जिल्ह्यात वनक्षेञ फक्त २.४० टक्केच असल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये तीन-चार वर्षाला दुष्काळ पडतो. यासह इतर समस्यांचा सुद्धा सामना येथील नागरिकांना करावा लागतो. बीडमध्ये 2.40% वनक्षेत्र असून सुद्धा आजपर्यंत तरी वन विभागाने बीड जिल्ह्यात सकारात्मक काम केलेले दिसत नाही व तसा प्रयत्नही होत नाही. यामुळे आता जिल्हाधिकारी महोदय यांनीच बीड जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढावे यासाठी विशेष पुढाकार घेण्याची गरज आहै. गेल्या दोन वर्षापासून वन विभागाला कायमस्वरूपी अधिकारीच नसल्यामुळे येथील कामकाज ठप्प झाले आहे.
बीड जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र कमी असल्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. बीड जिल्ह्यातील वनक्षेञ वाढावे यासाठी वन विभागाने विशेष पुढाकार घेण्याची गरज आहे. बीड जिल्ह्यातील अनेक डोंगराळ भाग किंवा सामाजिक एकतेतुन येथे वनक्षेत्र वाढवण्यासाठी वन विभागाने जर पुढाकार घेतला तर बीड जिल्ह्यामध्ये काही वर्षातच वनक्षेत्र वाढण्यास मदत होईल, परंतु तशी मानसिकता मुळात येथील अधिकाऱ्यांमध्ये व नेत्यांमध्येही दिसत नाही. यामुळे वर्षानुवर्ष बीड जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी कमी होत चालले आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षापासून वन विभागाला कायमस्वरूपी अधिकारीच नाहीये. सध्या गीते यांच्याकडे वन विभागाचा अतिरिक्त परिवार असल्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी विशेष असे कार्य करताना दिसत नाहीत. वन विभागामध्ये जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन बीड जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले तर भविष्यामध्ये बीड जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढेल व त्याचा फायदा बीड जिल्ह्यातील नागरिकांना नक्की होईल. परंतु बीड जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढावे यासाठी वन विभाग विशेष पुढाकार घेत नाही. आता यासाठी येथे राजकीय नेत्यांनी सुद्धा विशेष लक्ष देऊन येथील वनक्षेत्र वाढवण्यासाठी हातभार लावण्याची गरज आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या लाकडी मिशन कोणाच्या आशीर्वादाने चालतात?
बीड जिल्ह्यामध्ये मुळात वनक्षेत्र कमी आहे. त्यातही जिल्ह्यांमध्ये 100 च्या जवळपास लाकडी मशीन सुरू आहेत. नेमक्या या लाकडी मशीन कोणाच्या आशीर्वादाने चालतात या चालकांना कोणाचे पाठबळ मिळते. खरंच वन विभागातील अधिकारी नेमकं करतायेत तरी काय यासह इतर प्रश्न बीड जिल्ह्यातील वृक्षतोडीवरून उपस्थित होत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड सुरू असून वन विभाग कशामुळे फक्त बघण्याची भूमिका घेतोय हेच कळायला मार्ग नाही. एक तर वन विभाग झाडे लावण्यासाठी विशेष पुढाकार घेत नाही व त्यातही वृक्ष तोडू होत असताना सुद्धा कारवाईची भूमिका घेत नाही. यामुळे वन विभागाकडे जिल्हाधिकारी महोदयांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.