केज/ प्रतिनिधी
शासकीय विश्रामगृह केज येथे दिनांक ८ मार्च २०२३ रोजी दलित चळवळीतील कार्यकर्ते लखन हजारे व विजय लांडगे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की,रमाई नगर भागातील गायरान धारक यांना बेघर होऊ देणार नाही.आम्ही आपल्या कायम सोबत आहोत. रमाई नगरच्या गायरान जमिनीच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,लखन हजारे व विजय लांडगे यांनी पत्रकार परिषद आयोजित करून सदरील पत्रकार परिषदे मध्ये सांगितले की,केज मध्ये एक स्वयंघोषित समाज सेवक ज्याचे की समाजा मध्ये कार्य शून्य आहे.
परंतु तो व्यक्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये ही सहभागी नसतो तो व्यक्ती समाजाच्याअडीअडचणीव कामात देखीलसहभागी नसतो त्याच बरोबर समाज हिताच्याआंदोलना त रस्ता रोकोमध्ये अथवा दलितावर झालेल्या अन्य अत्याचारात व विविध घटना तो व्यक्ती कधीही सहभागी नसतो या उलट तो व्यक्ती समाजाच्या विरोधात उभा असतो. असा व्यक्ती एका विषया वर आमच्या समाजातील दिनदलित गोरगरीब नागरिक व भोळ्या भाबड्या महिला आहेत. त्यांचे लक्ष विचलित करून त्या महिलांच्या अशिक्षित पणाचा फायदा घेत महिलांना खोटी माहिती देऊन स्वतःची राजकीय पोळी भाजत आहे.रमाई नगरच्या गायरान धारकाचा लढा हा आम्ही उभा केला आहे व दलित चळवळीतील सर्व आमच्या सहकाऱ्यांनी मिळून आम्ही प्रत्येक गायरानधारकाला त्या ठिकाणी बसवलेले असून प्रत्येकाला त्या ठिकाणी घर दिले आहे.आत्ता ते घर वाचवण्याचं काम आम्ही स्वतः करत आहोत.तो व्यक्ती काल परवापासून काय करतोय की त्यांनी नगरपंचायतला माहितीचा अधिकार दिलेला आहे आणी तो व्यक्ती त्यांनी दिलेल्या माहितीच्या अधिकार पत्राच्या आधारे नगरपंचायत केज यांनी त्या व्यक्तीस दिलेल्या पत्राची झेरॉक्स प्रत आमच्या माता भगिनींना वाटत आहे व त्या झेराॕक्स प्रति मध्ये काहीच तथ्य नाही असे लखन हजारे व विजय लांडगे यांनी सदरच्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. पुढे बोलताना लखन हजारे यांनी म्हटले आहे की,त्या व्यक्तीचे स्वतःचे राजकीय अस्तित्व संपलेले आहे व स्वतःची राजकीय पोळी भाजत आहे आणी समाजाची देखील दिशाभूल करत आहे.त्या कारणास्तव ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली असून या प्रकरणा विरुद्ध यापुढे आम्ही मोठा एल्गार पुकारणार आहोत त्याचबरोबर आम्ही रमाई नगर येथील सर्व गायरान धारकांच्या सोबत सर्व दलित चळवळीतील कार्यकर्ते म्हणून उभा आहोत.परंतु त्या व्यक्तीने गायरान धारकाच्या प्रकरणाचे खोटेनाटे कागद दाखवुन गोरगरीब निरक्षर महिलांना खोटी नाटी माहिती देऊ नये व गायरान धारकाच्या प्रकरणाचे स्वतःच्या हितासाठी श्रेय लाटू नये.
लखन हजारे व विजय लांडगे यांनी कोणाच्याही नावाचा नाम उल्लेख न करताच टोला लगावला आहे.त्या व्यक्तीला वार्ड क्रमांक सात मधूनपराभव झालेला आहे. तो पराभव त्या व्यक्तीसपचवताआला नाही म्हणून आमच्याच समाजाच्या नगराध्यक्षा आहेत त्यांना तो व्यक्ती नगराध्यक्ष यांच्या नावाचा व विदर्भाची बाई असा एकेरी उल्लेख देखील करत आहे.यापुढे त्या व्यक्तीने गायरान धारक अशिक्षित महिलांना खोटी नाटी माहिती देऊन स्वतःची प्रसिद्धी केली तर त्याच्याविरुद्ध यापुढे मोठा एल्गार पुकारण्यात येईल असा ईशारा देखील लखन हजारे व विजय लांडगे यांनी दिला आहे.