Beed : अलीकडे सायबर चोरीच्या घटना घडत आहेत. मागील काही दिवसात सुनीता प्रवीण जाधव , रा. तलखेडा, तालुका माजलगाव, लक्ष्मण गुलाबराव वंजारे, रा. शाहूनगर बीड, नरेश बाबुराव शिंदे, रा चंपावतीनगर, बीड, चंद्रकांत जगन्नाथ ननावरे रा नेकनूर, बीड, आशुतोष बाळासाहेब घोडके, बीड, या सर्वांचे ऑनलाइन फसवणूक होऊन बँक खात्यातून परस्पर रक्कम 2,68,000 चोरीस गेले होते. ते मागील 8 दिवसांत परत मिळवले आहेत.
यातील पिडीतानी किंवा तक्रारदारांनी याबद्दल श्री नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक, बीड आणि श्री सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक, बीड यांस भेटून समाधान व्यक्त केले आहे .
तसेच सायबर पोलीस ठाणे बीड आवाहन करते की, कुणीही अनोळखी लोकांशी फोन, एसएमएस, सोशल मीडिया वरुन देवाण घेवाण, पैसे व्यवहार , व्यापार करत असताना संपूर्ण खात्री करावी. हिंदी भाषिक येणारे कॉल हे फसवणाऱ्या लोकांचे असू शकतात, QR कोड पाठऊ नका, कोणतेही अनोळखी ॲप, लिंक खात्री केल्याशिवाय डाऊनलोड करू नका .
ही कामगिरी श्री नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक, श्री सचिन पांडकर , अपर पोलिस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनखाली शीतलकुमार बल्लाळ, पोलिस निरीक्षक, आणि पोलिस अमालदार अनिल डोंगरे, आशिष वडमारे सायबर पोलीस ठाणे, बीड यांनी केली आहे.