सलमान अहमदच्या झुंजार खेळीने क्रिकेट प्रेमींची मने जिंकली
बीड प्रतिनिधी – क्रिकेट प्रेमींची जिल्हा क्रीडा संकुलावर असलेली गर्दी… प्रेक्षकांच्या टाळ्या.. ढोलीबाजाचा जल्लोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात बीड येथे अनिलदादा फेन्ड्स क्लबच्यावतीने आयोजित टी-20 क्रिकेट मालिकेतील अंतिम सामना सर्व क्रीडा प्रेमींनी रविवारी अनुभवला. आदर्श क्लब विरुध्द शेकाप बीड संघात झालेली अटीतटीची लढत क्रीडा प्रेमींच्या मनाचा ठाव चुकवून गेली. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप, एडीएफसी चषकाचे अध्यक्ष अजय जाधव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष अॅड.सुभाष राऊत, सचिनराव गायकवाड, कर्मयोगी बँकेचे सुदर्शन धांडे, चंद्रकांत अग्रवाल, मनोज जोगदंड, संतोष जाधव, रामेश्वर घाडगे, विष्णु कारले, राजेश जाधव, महेश रसाळ, महेश चौरे, पंकज कुटे, निलेश छाजेड यांची उपस्थिती होती.
आज झालेल्या अंतिम लढतीत आदर्श विरुध्द शेकाप सामण्यात नाणेफेक जिंकून आदर्श संघाने प्रथम फलंदाजी करतांना 20 षटकात 9 फलंदाजांच्या बदल्या 136 धावांचे आव्हान शेकाप बीड संघासमोर ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करतांना शेकाप संघाने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन क्रीडा प्रेमींना दाखवले. सलमान अहमदच्या नाबाद 50 चेंडूत 66 धावा यात त्याने 4 षटकार आणि 6 चौकाराच्या जोरावर अटीटतिच्या सामन्यात शेकाप संघाला एक हाती विजय प्राप्त करून दिला तर प्रथम फलंदाजी करताना आदर्श संघाकडून राजेंद्र कदमने 5 चौकार आणि 1 षटकाराच्या जोरावर 37 धावा केल्या. स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पुरस्कार शेकापचा मोहमद वसीम, बेस्ट विकेट किपर आदर्शचा मोहसीन खान, उत्कृष्ट गोलंदाज मुदस्सर मुल्ला, उत्कृष्ट फलंदाज सचिन धस, मॅन ऑफ द सिरीज विनित ढाका, अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच सलमान अहमद, बेस्ट डिसीप्लीन टीम केसोना क्रिकेट क्लब संघाला 21,000/- हजाराचे परितोषीक, द्वितीय विजेता संघ आदर्श क्रिकेट क्लबला 55,555/-चे पारितोषीक तर प्रथम विजेता ठरलेल्या शेकाप संघास एडीएफसी चषक टी -20 चषक आणि रोख 1,11,111/- हजाराचे पारितोषीक अॅड.सुभाष राऊत आणि सुदर्शन आण्णा धांडे यांच्यावतीने देण्यात आले. एडीएफसी चषकात प्रत्येक संघावर बक्षीसांची लयलुट झाली. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या संघाला अशोक चव्हाण, संदीप देशमुख, अर्जुन काळे, गोपाळ गुरखुदे, संजय धस, संतोष जाधव, शत्रुघ्न पटेल, चंद्रकांत अग्रवाल यांनी बक्षीस जाहीर केले. दरम्यान दि. 11 जानेवारीपासून बीड येथील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर होत असलेल्या अनिलदादा फेन्ड्स क्लब आयोजित राज्यस्तरीय टी-20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत सर्वच सामने रोमहर्षक आणि अटितटीचे पहायला मिळाले.
सर्व सामने यशस्वी पार पाडण्यासाठी अनिलदादा फ्रेन्ड्स क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अजय जाधव, सचिव सचिन गायकवाड, उपाध्यक्ष अख्तर शेख, कोषाध्यक्ष रामेश्वर घाडगे, सहसचिव मनोज जोगदंड, संघटक राजेश आघाव,संजय राठोड, संतोष पिंगळे,
अॅड. सागर नाईकवाडे,अॅड.सुधीर जाधव, गोपाळ गुरखुदे, संदीप बायस,निलेश छाजेड, अमोल ससाणे, राजुभाई शेख, निसार तांबोळी, सय्यद निसार, गोविंद आगे, सुनील गोपीशेट्टी, हनुमान इनकर, समाधान सोनवणे, शेख खदीर, पिंटूसेठ नखाते, भागवत पेंढारे, प्रा. विजय जाधव, वसीम अन्सारी, संदीप जाधव, फेरोज मोमीन, संदेश भोपळे, शेख कलीम, आनंद शिंदे, शेख आरेफ, योगेश वादे, अतिक कुरेशी, राहुल तावरे, सनी जोगदंड, अमर ससाणे, जहीर शेख, संजय जाधव, संदीप गोरे, राहुल कागदे, चंदन महाजन, गणेश चव्हाण, संदीप दुधाळ, विक्रम चव्हाण, सचिन जगताप, श्रीकांत सिरसट, प्रविण साळुंके, रामु शेलार, अशोक पूर्णे, राहुल व्यवहारे, सुनील वाघमारे समालोचक अनिल शेळके इंग्लिश कॉमेंटरी अथर्व शेळके, स्कोरर सर्फराज मोमीन या सर्वांचे मोलाचे योगदान राहिले.