मोमीनपुरा येथे उस्मान हाॅस्पिटलचे उद्घाटन
बीड (प्रतिनिधी) – शहरातील मोमीनपुरा भागात उस्मान हॉस्पिटलचे उद्घाटन जलील मामु व उलेमा ए इकराम आणि एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
उद्घाटन प्रसंगी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना शफिक भाऊ म्हणाले की, कोरोना काळात जिथे फक्त रुग्णच नाही तर अनेक डॉक्टर सुद्धा घाबरले होते. तिथे डॉक्टर शारेक यांनी स्वतःला रुग्णसेवेत झोकून दिले होते. त्यांच्या कोरोना काळातील या सेवेमुळे शेकडो रुग्ण बरे झाले. तेव्हापासून त्यांना या परिसरातील लोक डॉक्टर शारेक खरे रूग्णसेवक असल्याचे म्हणू लागले आहे. खरेच त्यांनी एक डॉक्टर या नात्याने केलेली रुग्णसेवा ही मानवतेच्या दृष्टिकोनातून निश्चितच वाखाणण्यासारखी आहे. आता उस्मान हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी रुग्णांसाठी एक चांगला दवाखाना सुरू केला आहे. याचा या परिसरातील नागरिकांसह इतर भागातील रुग्णही निश्चितपणे लाभ घेतील असे म्हटले.
यावेळी मुफ्ती अब्दुल्लाह सहाब, मुफ्ती नासेर सहाब, मौलाना अब्दुल रहीम सहाब, नगरसेवक अजहर मोमीन, अब्दुल बारी भाई, शमशू भाई देवलेकर, हुसेन मिया, पञकार अमजद भाई, एआयएमआयएम शहराध्यक्ष शिवाजीराव भोसकर, दैनिक सिटीझन चे कार्यकारी संपादक जुल्फेखार अली सहाब, कलीम सौदागर, शफीक देवलेकर, रफिक भाई सौदागर, खाजा भाई, मोहसीन भाई, वाजेद भाई, अदनान खान, एआयएमआयएम पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष आणि मार्गदर्शक एजाज भाई उर्फ खन्ना भैय्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन समारंभात उपस्थित राहिल्याबद्दल मान्यवरांसह सर्व नागरिकांचे डॉ. शारेक व अरबाज इनामदार यांनी आभार मानले.