क्रिकेटमुळे टीमवर्क, समन्वय, विश्वास,व नियोजन आत्मसात होते..रामहरी मेटे
राज्यस्तरीय लेदर बॉल टी-२० क्रिकेट स्पर्धेस रामहारी मेटे यांनी भेट देत खेळाडूंचे मनोबल वाढवले ..
बीड– एडीएफसी क्लबच्या वतीने 11 जानेवारी पासून येथील श्रीमत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरु असलेल्या राज्यस्तरीय लेदर बॉल टी-२० क्रिकेट स्पर्धेस शिवसंग्राम नेते रामहारी भैय्या मेटे यांनी भेट देत खेळाडूंचे मनोबल वाढवत सामन्यातील खेळाडूंचे हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
क्रीडा संकुलावर 20 जानेवारी रोजीच्या बीड पोलीस विरुद्ध शेकप संघ सामन्यास प्रथम सत्रात प्रमुख अतिथी म्हणून शिवसंग्राम नेते रामहारीभैय्या मेटे उपस्थित होते.त्यांच्यासह शिवसंग्राम नेते नितीन आगवान,शेषेराव तांबे,मुकुंद गोरे,हरिश्चंद्र ठोसर,राकेश जाधव या मान्यवरांचीही उपस्थिती होती.
याप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना रामहरी मेटे यांनी सांगितले की,खेळ हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे जो खेळणाऱ्या सर्व लोकांना टीम वर्क, समन्वय यासारखे विविध गुण शिकण्यास मदत करतो आणि शरीराला मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो.अभ्यास आणि खेळ या दोघांना जीवनात तितकेच महत्वाचे आहेत, किंबहुना दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सतत काम केल्याने तुम्ही थकत नाही तर तुमची काम करण्याची क्षमता कमी होते. म्हणून, चांगली काम करण्याची क्षमता आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी कधीहि तंदुरुस्त असावे. हा तुम्हाला आवडणारा कोणताही खेळ असू शकतो.म्हणून, व्यस्त दिवसातून थोडा वेळ काढणे आणि तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्यासाठी एखाद्या खेलात गुंतून वेळ घालवणे महत्वाचे आहे.खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर आपले करिअर करण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. खेळ खेळाडूला चांगला खेळ दाखवणासाठी आपली बुद्धी कशी वापरावी हे शिकण्यास मदत करते. हे टीमवर्क, समन्वय, विश्वास, नियोजन शिकवते आणि शरीराला तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवण्यास मदत करते. जो व्यक्ती क्रीडा क्रियाकलापांमध्ये सामील आहे त्याची शारीरिक आणि मानसिक वाढ खूप चांगल्या पद्धतीने होते.