हत्या प्रकरण; पोनि बाळासाहेब आघावांचा अडचणी वाढल्या
हत्या प्रकरणाची चौकशी पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्याकडे
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : पिंपळनेर ठाणेहद्दीत मंगळवारी दिनेश मतेची हत्या झाली होती. या प्रकरणी पोलीसांनी वेळीच मतेची फिर्याद घेतली असती तर यात मतेचा जिव वाचला असता अशी फिर्याद मयताच्या पत्नीने पोलीसांत दिली. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्याकडे विशेष तपास करण्याची जबाबदारी सोपवली आहे. दिनेश मते हत्या प्रकरणात कुचराई करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करू असे मत प्रारंभशी बोलताना पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी व्यक्त केले.
पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीमध्ये 17 जानेवारीला दिनेश मते याची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणामध्ये पोलीसांनी वेळीच दखल घेतली असती तर आज दिनेश मतेचा जीव वाचला असता, पोलीसांनी फिर्याद न घेतल्यामुळे दिनेश मतेचा जीव गेला अशी तक्रार मयताच्या पत्नीने पोलीसांत दिली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पो.अ.नंदकुमार ठाकूर यांनी या प्रकरणी एक समिती नेमली असून ही समिती लवकरच सत्य काय आहे याचा अहवाल पोलीस अधीक्षकांना देणार आहे. पोलीस उपअधीक संतोष वाळके हे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्या पोलीसांवर कारवाई होणार आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहा.पो.नि.बाळासाहेब आघाव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.