-पंकजा मुंडे सत्तेपासून दुर; खासदार प्रितम मुंडे यांना सुद्धा काही करता येईना!
-गडाचा सेवेकरी म्हणून सेवा करण्याची जबाबदारी स्विकारतो – उपमुख्यमंत्री
-गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमाला पंकजामुंडेंची गैरहजरी तर देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या!
प्रारं वृत्तसेवा
बीड : भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पक्षच डावलताना दिसत असल्याचे मराठवाडयातील एका कार्यक्रमातुन दिसून आले. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दौरे वाढले असून चालू महिन्यात दोन दौरे झाले आहेत. विशेष म्हणजे या दोन्हीही कार्यक्रमाला पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे गैरहजर राहीलेल्या आहेत. यामुळे राजकिय वर्तूळात अनेक चर्चांना उधान आले आहे. भाजपाची सत्ता असून सुद्धा पंकजा मुंडे यांना सत्तेपासून का दुर ठेवण्यात आले, मॅनेंजमेंटचे राजकारण मला जमत नाही हे तार्इंना म्हण्याची वेळ का आली, बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांनी का दुर्लक्ष केले, दोन्हीही ताई जिल्ह्यात जास्त वेळ का देत नाहीत? यासह अनेक प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. उपमुख्यमंत्री यांनी बीड जिल्ह्यात जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली आहे का? साहेबांच्या लेकींना मुद्दाम टार्गेट करण्यामागचे मुख्यकारण काय यासह इतर प्रश्नांची उत्तरे जनतेला न समजण्यासारखे असले तरी यातून बाहेर कसे पडायचे हे मात्र तार्इंना चांगले माहित आहे. परंतू ताई योग्य वेळेची वाट पाहत असल्यातरी त्यांना लवकर योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे.
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे आज (ता. 15) संत वामनभाऊ महाराज यांच्या 47 व्या पुण्यतिथीनिमीत्त आयोजीत कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी गडाचे महंत विठ्ठल महाराज, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार लक्ष्मण पवार, माजी आमदार भिमराव धोंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह इतर प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, बाबांचा व गडाचा सेवेकरी म्हणून आपण मला दिलेली जबाबदारी मी स्विकारतो, पुढे बोलताना ते म्हणाले की, याठिकाणी मला भक्तांचा महासागर पाहिला मिळाला. यासह इतर मुद्यांना त्यांनी हात खालत त्यांचे भाषण संपवले. परंतू त्यांच्या भाषणात कुठेही तार्इंचा उल्लेख दिसला नाही. चालू महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्ह्यात दोन दौरे झाले आहेत. 31 डिसेंबर 2022 ला ते व्यसनमुक्ती कार्यक्रमाला आर्वजून उपस्थित होते व आजच्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित होते. परंतू या दोन्हीही कार्यक्रमाला दोन्हीही ताई गैरहजर राहील्यामुळे राजकीय वर्तूळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांना वारंवार पक्ष का डावलत आहे. अनेक वेळा हे समोर आलेले आहे. सध्या तर सत्ता असून सुद्धा तार्इंना सत्तेपासून दुर ठेवण्यात आलेले आहे. 2014 नंतर पालक मंत्री झालेल्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यासह राज्यात चांगली कामे केली होती. प्रचंड अभ्यास असलेल्या नेत्याला पक्षा अंतर्गत असलेल्या वादामुळे दुर ठेवण्यात येत असल्याची चर्चा जोर धरत आहे. तरी तार्इंनी वेळीच योग्य निर्णय घ्यावा अशी चर्चा होऊ लागली आहे.
दोन्हीही तार्इंचे बीड जिल्ह्याकडे दुर्लक्ष
2019 मध्ये परळी मतदार संघातून पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याकडे फारसे लक्ष दिलेले नाही. परळी मतदार संघात सुद्धा तार्इंचे विशेष असे लक्ष दिसून येत नाही. यामुळे 2024 ची विधानसभा व लोकसभा निवडणूक ताई कशी जिंकणार हे मात्र न समजण्यासारखेच आहे. नागरीकांच्या समस्या समजून घेण्यासाठी तार्इंना बीड जिल्ह्यात राहणे गरजेचे असताना सुद्धा ताई का दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे. यासह खासदार ताई सुद्धा जिल्ह्यात फारसे लक्ष देताना दिसत नाही. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असून सुद्धा खासदार प्रितम मुंडे यांना जिल्ह्याचा विशेष असा विकास करता आलेला नाही. यामुळे 2024 च्या लोकसभेच्या वेळेस तार्इंना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. निवडणूकांसाठी अजून बराच काळ बाकी असल्यामुळे वेळीच दोन्हीही तार्इंनी त्यांची भुमिका स्पष्ट करुन कामाला लागण्याची गरज आहे.