स्व. विनायकराव मेटे यांनी व्यसनमुक्तीची लावलेली “ज्योत” पुढे नेऊ – कै.अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान
बीड प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षापासुन बीड येथे दिनांक ३१ डिसेंबर रोजी उदात्त सामाजिक दृष्टीकोनातुन व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाचे प्रणेते स्व.मा.आ. श्री. विनायकराव मेटे आहेत हे जिल्ह्याला विदीत आहे. आदरणीय साहेबांच्या संकल्पनेतुन दरवर्षी (कोरोनाचा अपवाद वगळता) संपन होणा-या या कार्यक्रमास साहेबांच्या विचारांचा वसा पुढे चालवणा-या समाज घटकांचे उत्तरदायित्व विचारात घेवुन यावर्षी देखील दि. ३१ डिसेंबर रोजी व्यसनमुक्तीसाठी जनजागृती महारॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.
३१ डिसेंबर थर्टी फस्टच्या नावाखाली डर्टी मुहूर्त साधत नवयुवक व्यसनाला सुरूवात करतात. युवकांना व्यसनाच्या आहारी जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी स्व.आ. विनायकराव मेटे यांच्या पुढाकारातून मराठवाडा लोक विकास मंच, सामाजिक न्याय विभाग व कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या वतीने व्यसनमुक्ती संगीत रजनी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन मागील काही वर्षांपासून केले जायचे यात जनजागृती रॅली, मॅरेथॉन स्पर्धा, निबंध स्पर्धा, संगीत रजनी, सांस्कृतीक कार्यक्रमात प्रबोधन, मनोरंजन, हास्य विनोदासह अनेक कार्यक्रमातून व्यसनमुक्तीचे प्रबोधन करण्याचे काम केले जात होते. मात्र विनायकराव मेटे यांच्या दुर्दैवी निधनानंतर या व्यसनमुक्तीच्या चळवळीला खंड पडणार की काय अशी चर्चा सुरू असताना कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गीय आ. विनायकराव मेटे यांनी व्यसनमुक्तीसाठी लावलेली “ज्योत” पुढे नेणार असल्याचे म्हटले आहे.