कुंडलिक खांडेंची विरोधी गटाला धमकी; तिघांवर पिंपळनेर पोलीसात गुन्हा दाखल
Beed ः मी मोठा माणूस आहे. काहीही करील, खोट्या केसमध्ये अडकवील अशी धमकी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी गावातील ग्रामपंचायतमधील विरोधी गटाच्या पॅनलप्रमुखांना दिली. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात कुंडलिक खांडेंसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेषेराव साहेबराव खांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बीड तालुक्यातील म्हाळस जवळा येथे सरपंचपदासाठी पॅनल उभा केला होता. तर विरोधी गटाकडून शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा पॅनल होता. त्यांचा विजय झाल्यानंतर मंगळवारी (दि.20) रात्री 11.30 सुमारास कुंडलिक हरिभाऊ खांडे, गणेश हरिभाऊ खांडे, नामदेव हरिभाऊ खांडे, गोरख रामप्रसाद शिंदे यांनी विजयी निवडणूक मिरवणूक आटोपून आल्यानंतर आम्हाला ग्रामपंचायत निवडणूकीत विरोध का केला? मी खुप मोठा माणुस आहे. तुम्हाला खोट्या केसमध्ये आडकीन असे म्हणून शिवीगाळ करत घरावर दगडफेक केल्याची फिर्याद दिली आहे. या प्रकरणी कुंडलिक खांडेसस चौघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात कलम 336, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव हे करत आहेत.