80 ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा
आष्टी प्रतिनिधी : आष्टी तालुक्यातील 109 ग्रामपंचायतच्या झालेल्या निवडणुकीमध्ये माजी राज्यमंत्री आमदार सुरेश धस यांचेच वर्चस्व अबाधित असल्याचे दिसून आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांच्या समर्थकांनीही काही ठिकाणी विजय प्राप्त केला आहे कडा मुर्शदपुर ,कासारी धामणगाव ,खडकत ,टाकळसिंग आणि लोणी या मोठ्या लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत मध्ये आमदार सुरेश धस समर्थक विजयी झाले असल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी अलर्ट करणारा निकाल समजला जात आहे.
महाराष्ट्र राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे भारतीय जनता पार्टीच्या आमदार सुरेश धस यांनी या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये लक्षणीय मिळवल्याचे दिसून येत आहे प्रत्येक ग्रामपंचायत ही पक्षीय पातळीवर लढवली गेली नसली तरी स्थानिक पातळीवर नेत्यांचे फोटो वापरण्यात आले होते तालुक्यातील एकूण 19 ग्रामपंचायत पैकी आमदार सुरेश धस यांचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 65 ग्रामपंचायती असून 10 ग्रामपंचायतीमध्ये आमदार सुरेश धस, आमदार भीमराव धोंडे आणि आमदार माजी आमदार साहेबराव दरेकर तर पाच ग्रामपंचायतीमध्ये आमदार दस आणि माजी आमदार दरेकर यांचे समर्थक निवडून आलेले आहेत असा अशा एकूण ८० ग्रामपंचायत भाजप ताब्यात आल्या असून लक्षवेधी लढती आष्टी तालुक्यातील धामणगाव ही मोठी बाजारपेठ असलेली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमदार सुरेश धस समर्थक श्रीमती संजना रावसाहेब गाढवे यांनी 2161 इतक्या मताधिक्याने विरोधी उमेदवाराचा पराभव करून आष्टी तालुक्यात सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान प्राप्त केला आहे. तर कडा ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीमध्ये आमदार सुरेश धस समर्थक लता भीमराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखालील सुलोचना नारायण नाथ यांचेवर केवळ 114 मताधिकांनी निसटता विजय मिळवला.या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळेच पराभव झाल्याचे बोलले जात आहे. मुर्शदपुर कासारी येथील सरपंच पद निवडणुकीमध्ये आमदार सुरेश धस समर्थक शालन अशोक मुळे यांनी आमदार बाळासाहेब आजबे भीमराव धोंडे आणि भाऊसाहेब लटपटे यांचे नेतृत्वाखालील उमेदवार अश्विनी संदीप गर्जे यांचा 600 मतांनी पराभव केला.
आष्टी तालुक्यातील सरपंच पदांचे भाजपचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे,साकत अंजना सासवडे,कोहीणी – अरुणा जगताप,शिरापूर – सलोनी सोमनाथ गायकवाड,
बावी – संगीता गर्जे,चोभा निमगाव – भाग्यश्री गाडे,पारगाव जो.- पोपट शिराळे,केरूळ – मनिषा बापु सुपुत्रे,बीडसांगवी – शितल नंदकिशोर करांडे,लोणी – शारदा संजय रकटाटे,शेडाळा – शेख मुबीना जावेद,टाकळी अमीया – निशा सावता ससाणे,
पिंपरी आष्टी- अशोक पवार,मातवळी – स्वाती बांगर,मंगरूळ – पुष्पा दिंडे,ब्रम्हगाव – रोहिदास पवार,वाघळूज – सुनंदा सुभाष गुंड,
खडकत – सविता काटे,खरडगव्हाण – निता वाडेकर,सुलेमान देवळा – दादा घोडके,
म्हसोबा वाडी – शनिता शेकडे,
मांडवा – धुराबाई माळी,बेलगाव – तात्यासाहेब शिंदे,शेकापूर – आशा गर्जे,टाकळशिंग – बलभीम वाघमोडे,भाळवणी – मिनाक्षी निंबाळकर,पोखरी – अंगद शिंदे,कारखेल खु – सविता घूले,पांगुळगव्हाण – बाळासाहेब गिते,करंजी – सारीका आजबे,पांढरी – सुधीर पठाडे,उंदरखेल – ज्योती दहातोंडे,चिंचोली – सुनीता अडागळे,साबलखेड – अनिता बुरुंगुले,
पिंपरी घाटा – अर्चना आमटे,घाटा पिंपरी – कविता मुळीक,नांदूर -मंगल विधाते,
अंभोरा – सागर आमले,हाजीपुर – शहाजी सापते,हनुमंतगाव – संपत खेमगर,सालेवडगाव – सुप्रीया कराळे,हिंगणी – अनिता झांबरे,
चिंचपूर – सतिष ढवळे,सावरगाव घाट – शशिकला चंदनशिव,पारोडी – प्रतिभा परकाळे,
हातोळण – भारती मिसाळ,जळगाव – गोंडे संगीता पोपट,अरण विहीरा – आशा सिरसाठ,
कानडी खु – कारभारी गव्हाणे,
केळसांगवी – अस्मिता अजित घूले,डोंगरगण – ज्ञानेश्वर वाघ,वंजारवाडी – पार्वती महाजन,
मोराळा – रभाजी गर्जे,पाटसरा – अभय गर्जे,सांगवी पाटण -दत्तात्रय खोटे,ठोंबळ सांगवी – विकास अमृते,हिवरा – बाबासाहेब,खिळद -गहूखेल -प्रतिभा मल्हारी शिंदे,देऊळगाव घाट -शरद दळवी,पुंडी – प्रतिभा बाळासाहेब थोरवे,किन्ही – भरत भवर
धामणगाव – संजना गाढवे,कासारी मुर्शदपर – शालन मुळे,कडा – युवराज पाटील,खिळद,देविनिमगाव संदीप मार्कंडे,नांदा शामल अशोक औटे, देसुर अशोक भवर,तवलवाडी हिराभाऊ केरुळकर,आष्टा दैवशाला गणेश माळवे,जामगाव श्याम धस बिनविरोध, हाकेवाडी खंडू हाके बिनविरोध,फत्तेवडगाव काळे नानासाहेब मेहकरी कारभारी गव्हाणे,निमगाव बोडखा ईश्वर गोरक्षनाथ मटे,भातोडी छगुबाई त्रिंबक पांढरे आदी ग्रामपंचायत आहेत.