Beed : कालिका देवी विद्यालय शिरूर कासार नगरसेवक अर्जुन दादा गाडेकर यांच्या कडून आठशे मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप झाले.
रायमोह जिल्हा परिषद शाळा सहाशे मुलांना सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सुभाष काका क्षीरसागर यांच्याकडून शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप झाले.
लोणी हायस्कूल लोणी येथे अक्षय रणखांब नगरसेवक यांच्याकडून आजी माजी सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीमध्ये शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप झाले.
आजोळ परिवार राक्षसभुवन सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये वृद्धांना ब्लॅंकेट चे वाट करण्यात आले.
मतिमंद विद्यालय शिरूर कासार येथे विद्यार्थ्यांना खाऊ फळे चप्पल आणि बूटाचे वाटप
ग्रामीण रुग्णालय रायमोह येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
चौकट इंजिनीयर इझारुद्दीन मैनुद्दीन शेख हे अण्णा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधकामासाठी लागणारी ब्लू प्रिंट आणि अंदाजपत्रक वर्षभर मोफत देणार आहेत. पोलीस निरीक्षक शिरूर यांच्यामार्फत एसपींना तसे पत्र दिले.
या शुभप्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
काकूंनी नक्कीच विचारपूर्वक आपल्या पुत्राचे नाव जयदत्त ठेवले असणार.जय म्हणजे नेहमीच विजय अन दत्त म्हणजे कसल्याही परिस्थितीत मग ती आनंदाची असो वा दुःखाची विचलित न होता संयमाने स्वतःला सावरणे म्हणजे दत्त राहणे, काकूंचा पिंड तसा समाजकारणाचा, तसाच तो राजकीय पण होता.आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत काकूंचा जेष्ठ पुत्र म्हणून आदरणीय जयदत्त आण्णा क्षीरसागर यांनी समाजकारण व राजकारणाचे धडे आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली गिरवले असे जेष्ठ नेते श्री वसंत भाऊ सानप यांनी आपले मनोगत व्यक्त केले, आज याच राजहंसाचा आज वाढदिवस, रायमोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्याचे वाटप अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला, जातीपातीच्या राजकारणात मातब्बर लोकांना शह काटशह देऊन आण्णांनी आजही जनमानसात आपले स्थान टिकवून ठेवले आहे, असे प्रतिपादन श्री जालिंदर काका सानप यांनी केले, माणुस पारखण्याची कला त्यांना चांगली जमली आहे, असे प्रतिपादन सौ उषाताई सरोदे यांनी मनोगत व्यक्त केले,प्रत्येक गावात आज अण्णांचा हक्काचा कार्यकर्ता आहे आजही लोक हक्काने आण्णाकडे काम घेऊन जातात,आण्णा तितक्याच तत्परतेने कामाची सोडवणूक करतात असे श्री सुभाष शेठ क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले,राजकारणात उतार चढाव चालू असतो,आरोप प्रत्यारोप होत राहतात,पण महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात चारित्र्य संपन्न एक अवलिया धुरंधर व्यक्ती म्हणून आण्णाकडे पाहिले जाते,असे श्री भरत भाऊ जाधव यांनी सांगितले
आदरणीय आण्णासाहेब यांनी त्यांच्या मंत्री पदाच्या काळात अनेक कल्याणकारी योजना बीड जिल्ह्यात आणल्या असे श्री प्रभाकर सानप यांनी सांगितले, उजाड असलेल्या माळरानावर तलावांची निर्मिती करून ऊसतोड असणाऱ्या शेतकऱ्यांना ऊस बागायतदार बनवले असे श्री गोरख तागड यांनी सांगितले
आण्णा म्हणजे एक राजकीय राजहंस आहेत ,असे श्री सुलेमान पठाण यांनी सांगितले
आदरणीय आण्णासाहेब यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो,त्यांना यश,कीर्ती लाभो ,त्यांच्या हातून दीन दुबळ्याची सेवा घडो असे श्री सुधाकर जाधव यांनी सांगितले व अनेक मान्यवरांनी अण्णासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. अण्णा साहेबांचे स्वीय सहाय्यक प्राध्यापक महारुद्र डोंगरे यांनी अण्णा हे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा बरोबर विज पाणी सडक आरोग्य आणि शिक्षण या नैमित्तिक गरजांना आण्णा किती प्राधान्य देतात हे त्यांनी केलेल्या सर्व विकास कामांचा लेखाजोखा उदाहरणासह जनसामान्यांसमोर मांडला. या कार्यक्रमाला उपस्थित श्री राजाभाऊ जाधव, श्री अय्युब शेठ तांबोळी, श्री संजय दादा सानप , पत्रकार श्री राम काशीद डॉ. गाडेकर साहेब रायमोहाचे उपसरपंच श्री सुरेश जाधव , श्री भागवत नेमाने श्री जक्कीयोददीन शेख श्री मुकेश म्हेत्रे श्री हरी टाक श्री विनोद कुलकर्णी श्री राजेन्द्र सानप टाकळवाडीचे माजी सरपंच श्री शिवाजी वारे भानकवाडीचे माजी सरपंच श्री गोरख तागड सांगळवाडीचे माजी सरपंच श्री सुदर्शन सांगळे आव्हळवाडीचे सरपंच श्री चिंतामणी नागरगोजे दगडवाडीचे नेते श्री वैजिनाथ जायभाये धनगरवाडीचे सरपंच श्री साईनाथ कैतके व शिरूर नगरपंचायतचे नगरसेवक श्री अर्जुन गाडेकर नगरसेवक श्री अक्षय रणखांब नगरसेवक श्री वसंत काटे माजी सभापती श्री सतीश काटे इंजिनीयर इझारुद्दीन शेख शिरुर व रायमोहा परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी आणि उपस्थितांनी आदरणीय आण्णासाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.