खर्डेवाडी-तांदळवाडीची ग्रामपंचायत बिनविरोध शिवसंग्रामच्या ताब्यात
बीड: – स्वर्गीय मा.आ.विनायकरावजी मेटे साहेबांचे स्वप्न होते की, गावातील कामकरी, कष्टकरी, गोरगरीब, वंचित- उपेक्षित, विस्थापित तरूण जोपर्यंत समाजकारणात व राजकारणात येत नाही व आपल्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढत नाही तोपर्यंत त्याला न्याय मिळणार नाही. म्हणून शिवसंग्रामच्या माध्यमातून प्रस्थापिता विरुद्ध विस्थापितांची लढाई ही ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व पंचायतराजच्या निवडणुका लढवल्या जाणार व सर्वांना आपापले न्याय व हक्क व अधिकार मिळवून दिले जाणार अशी ग्वाही आपल्या भाषणातून ते नेहमी देत असत.बीड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर निवडणुका लढवल्या जाणार असे शिवसंग्रामच्या माध्यमातून ऐलान केले होते परंतु दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले.परंतु शिवसंग्रामच्या संग्रामी मावळ्यांनी साहेबांना दिलेला शब्द पाळत आज खर्डेवाडी – तांदळवाडीची ग्रुप ग्रामपंचायत बिनविरोध काढत स्वर्गीय मेटे साहेबांच्या चरणी गुलाल अर्पण केला. ज्या खुर्चीवर साहेब बसत होते त्या खुर्चीवर साहेबांचा फोटो ठेवून हा विजयोत्सव सर्व शिवसंग्रामच्या मावळ्यांनी साजरा केला परंतु हा विजय पाहण्यासाठी आपले साहेब हवे होते असे भावनिक उद्गार नवनिर्वाचित सरपंच अवधूत भोसले यांनी यावेळी काढले. गाव पातळीवर होणारा संघर्ष टाळत गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची किमया बीड तालुक्यातील बालाघाटावरील खर्डेवाडी तांदळ्याचीवाडी या गावांनी यानिमित्ताने साधली आहे.
स्वर्गीय मा.आ. विनायकरावजी मेटे साहेब यांच्या विचारांचा वारसा घेत गेल्या पंचवीस वर्षापासून ही ग्रामपंचायत शिवसंग्रामच्या ताब्यात आहे.काल जाहीर झाल्यानुसार सरपंचपदी शिवसंग्रामचे अवधूत विठ्ठल भोसले यांच्यासह सदस्यपदी दत्ता भोसले, वडजराम भोसले, गणेश तांदळे, सौ रोहिणी भोसले,सौ. मोहरबाई भोसले,सौ.प्रियंका तांदळे, सौ.सखुबाई सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही ग्रामपंचायत बिनविरोध आणण्यासाठी दशरथ भोसले,अर्जुन तांदळे,ज्ञानोबा भोसले रोहिदास भोसले, सोमीनाथ तांदळे, पांडुरंग तांदळे,डॉ. विलास काळकुटे,दलवीर पठाण,रामराजे काळकुटे, बन्सी बापू भोसले,धनंजय भोसले,यांनी विशेष प्रयत्न केले.शिवसंग्राम भवन येथे या सर्वांचे जंगी स्वागत सत्कार करण्यात आले. शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद,जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,सुहास पाटील,ऊसतोड कामगार नेते बबनराव माने, शिवसंग्राम नेते विनोद कवडे, योगेश शेळके,गोपीनाथ देशपांडे यांच्या हस्ते सर्वांचा यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला.शिवसंग्रामचे तुकाराम मांडवे व उत्तरेश्वर मांडवे याची मसेवाड़ी ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांचा देखील शिवसंग्राम भवन येथे मान्यवरांच्या हस्ते येथोचित स्वागत सत्कार करण्यात आला.
खर्डेवाडी व तांदळ्याचीवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत एकूण सात सदस्यांची आहे. गावच्या निर्णय प्रक्रियेत महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीची संधी दिली आहे. याशिवाय तरुण ग्रामपंचायत सदस्यांना देखील ग्रामपंचायती मध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. गावातील प्रत्येक समाजाच्या गटाला गावच्या विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेत व स्व.मा.आ. विनायकराव मेटे साहेब यांच्या चरणी हा विजय अर्पण करीत असल्याचे सरपंच अवधूत भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे यांनी स्वर्गीय मेटे साहेबांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की ज्यावेळी या गावात जाण्याचा प्रसंग आला त्यावेळी साहेब सांगायचे घाटावरील या गावांसह अनेक गावांनी मला राजकारणापलीकडे प्रेम दिले,आपुलकी दिली,मदत केली.त्यामुळे या भागात वावरताना मला आपलेपणाची जाणीव होते असे साहेब सांगायचे.अध्यक्ष भाषणात जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद यांनी खर्डेवाडी व तांदळ्याची वाडी या गावातील लोकांनी एकत्र येत ग्रुप ग्रामपंचायत बिनविरोध आणून खऱ्या अर्थाने लोकनेते विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली वाहिली अशा शब्दात गावकऱ्यांचे कौतुक केले.त्यांनी देखील बालाघाटावरील गावांचे आणि साहेबांचे नाते किती दृढ व संवेदनशील होते हे आपल्या भाषणात नमूद केले.विजची उमेदवारांचे अभिनंदन व ग्रामस्थांचेे कौतुक करत पुढील वाटचालीस यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद,जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,सुहास पाटील,ऊसतोड कामगार नेते बबनराव माने, शिवसंग्राम नेते विनोद कवडे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, योगेश शेळके,गोपीनाथ देशपांडे, गोपीनाथ बापू घुमरे व अन्य शिवसंग्राम पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.