रुई-शहाजानपूरच्या संग्रामी मावळ्यांनी स्व.मेटे साहेबांच्या चरणी विजयाचा गुलाल अर्पण केला…नानासाहेब कडबाने
बीड : स्व. विनायकरावजी मेटे साहेब यांच्या आशीर्वादाने व शिवसंग्रामचे युवानेते श्री.नानासाहेब कडबाने यांच्या पुढाकाराने रुई – शाहजानपूर ता. बीड येथील ग्रामपंचायतीचे तीन सदस्य…सौ. प्रयागाबाई संतराम सोनवणे, श्री.अर्जुन सोनवणे,श्री. विनोद लक्ष्मण घुमरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याबद्दल शिवसंग्राम भवन, बीड येथे नवनिर्वाचित सदस्याचे जंगी स्वागत सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शिवसंग्रामचे जेष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे, शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरीभैया मेटे, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,तालुकाध्यक्ष नवनाथ आप्पा प्रभाळे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे,युवानेते नानासाहेब कडबाने आदी पदाधिकारी,ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व.विनायकराव मेटे साहेबांचे स्वप्न होते की, विस्थापित तरुणांना समाजकारण व राजकारणाची संधी उपलब्ध करून देत आपल्या स्वतःच्या हक्क आणि अधिकाराच्या लढाईसाठी प्रस्थापितांविरुद्ध पेटून उठणे.त्याशिवाय सर्वसामान्य, वंचित, अपेक्षित व गोरगरिबांना न्याय मिळणार नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर आपल्या हक्काच्या लढाईसाठी केला पाहिजे. यासाठीच निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याशिवाय पर्याय नाही हे स्वर्गीय साहेबांचे विचार केंद्रस्थानी ठेवून आज शिवसंग्रामचा प्रत्येक मावळा सर्वसामान्याच्या हक्क आणि अधिकारासाठी झुंज देत आहे.नुकतीच बीड जिल्ह्यातील 132 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यापैकी राजुरी न. परिसरातील रुई-शाहजानपूर ही ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थांच्या वतीने बिनविरोध करण्याचा निर्णय जाहीर झाला आणि यामध्ये शिवसंग्रामच्या मावळ्यांनी आपल्या अस्तित्वाची लढाई लढून तीन जागा बिनविरोध मिळवत शिवसंग्रामला गुलाल लावत विजयी सलामी दिली. हा गुलाल रुई-शाहजानपूरच्या संग्रामी मावळ्यांनी स्व.विनायकरावजी मेटे साहेबांच्या चरणी अर्पण केला.
त्यानिमित्ताने शिवसंग्राम भवन बीड येथे सर्व तीनही सदस्यांचा शिवसंग्रामच्या वतीने येथोचित सन्मान करण्यात आला. खऱ्या अर्थाने स्व.साहेबांच्या नंतरही त्यांच्या विचारांचा वारसा प्रत्येक शिवसंग्रामचा मावळा जोपासत आहे व यासाठी सर्व शिवसंग्रामचे मावळे एकजूटीने व प्राणपणाने लढत आहेत. स्वर्गीय मेटे साहेबांचे स्वप्न शिवसंग्रामचे मावळे निश्चितपणे पूर्ण करतील आणि आपला गड राखतील.यात मात्र शंका नाही.अशा शब्दात शिवसंग्रामचे ज्येष्ठ नेते प्रभाकरआप्पा कोलंगडे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी त्यांच्या समवेत शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरीभैया मेटे, शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे , शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष नवनाथआप्पा प्रभाळे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, नानासाहेब कडबाने तथा शिवसंग्रामचे कार्यकर्ते व ग्रामस्ध बहुसंख्येने उपस्थित होते.