मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन मेट्रो शहराला एकमेकांना जोडणारा समृद्धी महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज समृद्धी महामार्गावरील कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपूर मेट्रो व समृद्धी महामार्गवरील जागेची पाहणी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. त्यासोबतच नागपूर मेट्रोच्या रिच टू व रिच थ्री याचे देखील लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पाहणी केली. या पाहणी दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांकडून पंतप्रधान मोदी यांचा दौरा व कार्यक्रमाची माहिती समजून घेतली. उद्घाटन कार्यक्रमाला 20 हजारांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जागेची पाहणी करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.