गेवराई तालुक्यात प्रशासनाचा धाकच राहीला नाही; अज्ञात सात जणांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
संग्रहित छायाचिञ
प्रारंभ न्युज
बीड : गेवराई चे तहसीलदार यांनी वाळूची वाहतूक करणारे नऊ वाहने ताब्यात घेतले होती. यातील पाच वाहने वाळूमाफियांनी दादागिरी करून चक्क घेऊन गेले. या प्रकारावरून लक्षात येते की गेवराई तालुक्यात वाळू माफियांची कशाप्रकारे दादागिरी वाढली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यामध्ये अनोळखी सात जणांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गेवराईतील माफिया राज संपवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याची गरज असतानाही याकडे मात्र जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
गेवराई चे तहसीलदार सचिन खाडे यांनी वाळूची वाहतूक करणारे नऊ वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली होती. ही सर्व वाहने तहसीलदार यांच्या ताब्यात होती. हि वाहने सुरक्षेच्या अनूषंगाने गेवराई आगारा मध्ये ठेवण्यात आली होती. अज्ञात सहा जणांनी गेवराई आगाराच्या मेनगेट परिसरातील भिंतीवरून उडी मारून आगारामध्ये प्रवेश करून सुरक्षा रक्षकाला दमदाटी करुन एकुण नऊ ट्रक्टरपैकी पाच ट्रक्टर त्यांचे कायदेशीर रखवालीतुन घेवुन गेले. फिर्यादी व त्यांचा सहकारी अशोक खताळ यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता ट्रक्टरवरील चालकांनी फिर्यादीला दमदाटी केली. स्वराज कंपनीचे ८५५ एफई लाल रंगाचे ट्रक्टर, महिंद्रा सरपंच ५९५ डीआय लाल कलरचे चे.नं. जीए६५०००१२ आर१ असा असलेले ट्रक्टर, स्वराज कंपनीचे ८५५लाल पांढरा चे नं ९९९०५६०००१०५ असलेले ट्रक्टर, स्वराज कंपनीचे ८५५ लाल रंगाचे ट्रक्टर चे.नं. ई४३१३२० / ००ए००३४ असलेले, स्वराज कंपनीचे ७४४ लाल रंगाचे ट्रक्टर चे.नं.सी७५९०९२सी असे एकूण पाच ट्रॅक्टर किंमत ११,१०,००० रू. किंमतीचा मुद्देमाल नेला. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात सात जणांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.