अपेंडिक्स, हर्निया, सिझर, डायलिसिस, थायरॉईड, गर्भपिशव्या, आतड्याचे, हाडाचे ऑपरेशन अशा शस्त्रक्रियांचा समावेश
बीड । प्रतिनिधी
बीड जिल्हा रुग्णालयचा शल्यचिकित्सक पदाचा पदभार डॉ.सुरेश साबळे यांनी घेतल्यापासून जिल्हा रुग्णालयाच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून त्याचा पाठपुरावा करून जिल्हा रुग्णाल्यात आलेल्या प्रत्येक लहान, थोर, वयोवृद्ध रुग्णा ला सेवा दिली. आणि सातत्याने गेल्या 11 महिन्या अतिशय अवघड गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या.जिल्हा रुग्णालयात स्वच्छता सह कर्मचाऱ्यांना शिस्त लावली. कर्मचार्यांना वेळेवर रुग्णसेवा देण्यासाठी भाग पाडले. एक जानेवारी ते एक डिसेंबर गेल्या 11 महिन्यात बीड जिल्हा रुग्णालयातील विविध विभाग च्या मार्फत जिल्हा रुग्णालयात लहान, थोर, वयोवृद्ध, रुग्णवर 2,73,674 रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.या मध्ये 1,3134 रुग्ण ऍडमिट झाले,8986 रुग्णावर योग्य शस्त्रक्रिया केल्या शस्त्रक्रिया केल्या.
9,421 डिलिव्हरी साठी माता ऍडमिट झाल्या त्यापैकी नॉर्मल डिलिव्हरी 5,206 – सिझरींग3,086 झालेले आहेत त्यापैकी 4350 मुले 3826 मुली जन्म झाला. टेस्ट तपासणी 92,245- तर गेल्या 11 महिन्यात 7504 रक्त संकलन झाले इतक्या संख्येने जिल्हा रुग्णालयात डॉक्टर कर्मचारी यांचा टीमवर्क झालेलं दिसून आलं. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या प्रत्येक रुग्णावर योग्य ते उपचार केले. जिल्हा रुग्णालय अंतर्गत 108 या अंबुलन्सच देखील मोठ योगदान राहिलेलं आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील परीसरात दिवस- रात स्वच्छतेसह विविध गोष्टीकडे लक्ष देत रुग्णालयात आलेल्या रुग्णावर उपचार केले आणि आवश्यक असणाऱ्या प्रत्येक रुग्णांच्या शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने अपेंडिक्स, हर्निया, मुतखडा, थायरॉईड, डायलिसिस , अतिआवश्यक असणाऱ्या शस्त्रक्रिया, गर्भपिशव्या सिजर, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, हाडांच्या शस्त्रक्रिया, कुटुंब शस्त्रक्रिया. अशा अनेक छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयच्या शस्त्रक्रिया विभागात पार पडल्या. एक जानेवारी ते एक डिसेंबर या अकरा महिन्याच्या काळात जिल्हा रुग्णालयात उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या. प्रामुख्याने या टीमवर्क मध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर. सुरेश साबळे, मार्गदर्शनाखाली (आर एम. मो.) डॉ.संतोष शहाणे बाह्यरुग्ण विभाग प्रमुख डॉ. राम आव्हाड, डॉक्टर सुधीर राऊत, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश सानप सह सर्व जिल्हा रुग्णातील वैद्यकीय अधिकारी,
मेट्रन रमा गिरी, उपमेट्रन संगीता महानोर, प्राचार्य डॉ. सुवर्णा बेद्रे. नर्सिंग चे विद्यार्थी या सह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी यांच्या सगळ्यांच्या सहकार्यांन बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णावर यांनी योग्य ते उपचार व शस्त्रक्रिया पार पडल्या. जिल्हा रुग्णालय अंतर्गत 108 ॲम्बुलन्स देखील अपघातातील रुग्णांना तात्काळ उपचारासाठी दाखल केल्यामुळे अनेकांचे प्राण हे वाचले. यावेळी 108 या ॲम्बुलन्स द्वारे पाचशे च्या वर एवढ्या अपघातातील रुग्णांना मदत केली.