बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुंडगिरीचे व वाळु माफीयाचे तसेच हातभट्टीची दारू तयार करुण विक्री करणाऱ्याचे व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणाऱ्या गुन्हेगारांचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन MPDA कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजिले आहे. या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक, वोड यांचे सुचनेवरुन पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब पवार पोलीस ठाणे अंबेजोगाई शहर यांनी दिनांक 02/11/2022 रोजी इसम नाम मोहन दौलत मुंडे वय 29 वर्षे रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड यांचे विरुद्ध MPDA कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बोड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी साहेब बोड यांना सादर केला होता.
सदर स्थानबध्द इसमा विरुध्द पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर व केज येथे खंडणी मागणे, दिवसा घरफोडी करणे. रात्री घरफोडी करणे, दरोड्याची तयारी करणे, जिवे मारण्याची धमक्या देणे, शिवीगाळ करणे, अवदय शस्त्र बाळगणे वगैरे स्वरुपाचे 08 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्यापैकी 04 गुन्हे न्यायप्रविष्ट असून 04 गुन्हे पोलीस तपासावर आहेत. सदरील इसम हा अंबाजोगाई शहरात व्यापाऱ्यांना धमक्या देवून त्यांचे कडून खंडणीची मागणी करत होता तसेच शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचं गंभीर गुन्हे करत असल्याने पोलीसांची त्याचेवर बऱ्याच दिवसांपासून करडी नजर होती. सदर इसमावर यापूवी CrPC 110 प्रमाण दिनांक 22/09/2022 रोजी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा चढत्या क्रमाने गुन्हे करण्याचे चालूच ठेवून होता.
सदर प्रकरणात श्री. राधाविनोद अ. शर्मा, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिनांक 26.11.2022 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम. पी.डी.ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हसूल कारागृह औरंगाबाद येथे हजर करून स्थानवध करणे बाबत त्यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र. 2022 / आरबी डेस्क। पोल एम.पी. डी.ए. 08 दिनांक 26.11.2022 अन्वये आदेश पारीत केले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सूचना पो. नि. श्री. बाळासाहेब पवार पो.स्टे. अंबाजोगाई शहर यांना दिल्या होत्या. त्यांनी पो. नि. श्री. संतोषः वाघ. स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली गोपनिय खबऱ्याचे आधारे तावे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मार्फतीने सदर स्थानबद्ध इसमास ताब्यात घेतले पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे हजर केले व त्यानंतर योग्य पोलीस बंदोबस्तात हसूल कारागृह औरंगाबाद येथे दिनांक 2911.2022 रोजी 00 वा. हजर करून स्थानबध्द केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती कविता नेरकर, उपविपोअ अंबाजोगाई श्री. स्वप्निल राठोड, पो.नि. श्री. सतीष वाघ, स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि बाळासाहेब पवार, पोना वाडकर, पोना गोरे ने, पो.स्टे. अंबाजोगाई शहर व बीड स्थागुशा चे पोलीस हवालदार अभिमन्यु औताडे यांनी केलेली आहे. भविष्यातही हातभट्टीची दारु तयार करणारे. विक्री करणारे व वाळुचा चोरटा व्यापार करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांचेवर व दादागिरी करणाऱ्या व खंडणी बहाद्दर गुंडावर जास्तीत जास्त एम.पी.डी.ए. कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकुर यांनी दिले आहेत.