प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात डिजेचे नियम फक्त कागदावरच दिसत आहेत. जिल्ह्यात सर्रास डिजे चालकांकडून डिजे नियमांचे उल्लंघन होत आहे. शहरातील अनेक ठिकाणी लग्न सराईत जास्त पसंती डिजेला असल्यामुळे जवळपास सर्वच लग्नामध्ये डिजे दिसत आहेत. डिजे लावा, तुमचा आनंद साजरा करा पण आनंद साजरा करत असताना याचा दुसऱ्याला त्रास का? किती डिसेबल आवाजाला परवानगी आहे हे फक्त कागदावरच आहे. किर्कस डिजे सुरु असलेल्या परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्यांचे ऱ्हदयबंद पडण्यासारखा किर्कस आवाज रोजच जिल्हाकरांना त्रस्त करत आहे. विशेष म्हणजे नशेच्या तालावर झिंगाट झालेली तरुणाई तासनतास रस्त्यावर नाचत असल्यामुळे याचा त्रास वयोवृद्ध नागरीकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. यासह लहान मुळे, विद्यार्थी, जाणाऱ्या येणाऱ्या नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करावी अशा मागणी होत आहे.
जीवन जगत असताना प्रत्येकांचे इतरांना आपल्या वागण्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असते. परंतू जास्त पैसासाठी जिल्ह्यात काही महिन्यांपासून डिजेचा थयथयाट नागरीकांची डोके दुखी बनत आहे. जवळपास प्रत्येक लग्नात डॉल्बी लावलाच जातो, परंतू डॉल्बीचे नियम मात्र पाळण्यात येत नाहीत. लग्न म्हणटले की, आनंद उत्सव आलाच व हा आनंद मोठ्या आनंद सुद्धा साजरा केल्ा पाहीजे कारण आयुष्य खुप छोटे आहे. सर्वांनीच आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. परंतू हा आनंद साजरा करत असताना इतरांना याचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच आहे. परंतू याचा अनेकांना विसर पडल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात सर्रास डिजे चालक नियमांचे उल्लघंन करताना दिसत आहे. जास्तीत जास्त 60 डिसेबल आवाज कानांना सहन होऊ शकतो, परंतू येथील डिसेबल एवढा वाढला आहे की, डिजे जवळून जाताना ऱ्हदयाचे ठोके बंद पडतील असा तो आवाज आहे. युवकांना याचा जास्त परिणाम जाणवत नसला तरी वयोवृद्ध नागरीकांना मात्र याचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आता जिल्ह्यातील डिजे नियम फक्त कागदावर न राहता त्यांची अमंलबजावणी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.