सुर्डी फाटा ते सुर्डी सोनेसांगवी रस्त्यावरील खड्डयांच्या दुरुस्तीचे कामास सुरुवात… ॲड.मनिषाताई कुपकर
केज :-सुर्डी फाटा ते सुर्डी सोनेसांगवी रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्ती बद्दल शिवसंग्रामने आवाज उठवून दुरुस्ती बद्दल पाठपुरावा केला त्यास यश मिळून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली आहे.शिवसंग्रामच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अँड.मनिषाताई कुपकर यांनी नुकतीच त्याठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.
सुर्डी फाटा ते सुर्डी सोनेसांगवी या मुख्यमंत्री सडक योजनेतून झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा अँड. मनिषाताई कुपकर यांनी निवेदनाद्वारे केली होती. त्यास यश मिळून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
याबाबतीत मुख्यमंत्री ग्रामसडक रस्ते विकास योजनेअंतर्गत या कामावर १९४. ७५ दिनांक२३/०३ लक्ष रुपये खर्च करून रोजी हे काम पूर्ण झाले असल्याचे फलक त्या ठिकाणी दर्शविण्यात आलेल्या होते सदरील काम ठेकेदाराने या कामांमध्ये साईड पट्टी न भरता डांबर तर सील कोट न करता काम पूर्ण झाल्याचा बोर्ड लावलेला होता. परिणामी दोन महिन्याचा सदरील काम निकृष्ट असल्यामुळे पावसाळ्यापूर्वीच रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली होती. सदरील रस्ता निकृष्ट झाल्याची चौकशी करून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी याची योग्य दखल घ्यावी असा इशारा शिवसंग्रामच्या वतीने देण्यात आला होता शिवसंग्रामच्या वतीने या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालय बीड, तहसील कार्यालय केज, सार्वजनिक बांधकाम उपविभाग आंबेजोगाई येथे व प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालय बीड येथेही निवेदन देण्यात आलेले होते. यासंदर्भात खड्ड्याची दुरुस्ती बद्दल शिवसंग्रामच्यावतीने आवाज उठवून दुरुस्तीसाठी पाठलाग केला होता त्यात यश मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी शिवसंग्राम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड मनिषाताई कुपकर यांनी केली.