साहित्य संमेलनाच्या दुसर्या दिवशी दर्जेदार कथाकथन,परिसंवाद चर्चासत्र सादर
बीड । प्रतिनिधी
मासठी ख्रिस्ती साहित्याला गौरवशाली परंपरा आहे. ही परंपरा टिकली पाहिजे त्यासाठी ख्रिस्ती समाजातील तरुण मुले लिहीती वाचती झाली पाहिजेत. त्यासाठी चर्चची दारे तरुणांच्या मोफत शिक्षणासाठी खुली व्हावीत. कॉन्व्हेंट स्कूलने मुलांचे मोफत शिक्षण करावे. आजच्या या साहित्य संमेलनात तरुण दिसत नाहीत. सर्व साहित्यिक हे 70 ते 80 वर्षाच्या पुढे आहेत. यांच्यानंतर पुढे काय? ही गौरवशाली परंपरा टिकविण्यासाठी आम्हाला नवेक्षित लेखकांना घडवावे लागेल अन् त्यासाठी मोफत शिक्षणाची दारे खुली करावी अशी मत किशोर पाटिल यांनी मांडले. ते ख्रिस्ती साहित्य परंपरा या विषयावर चर्चासत्रात बोलत होते. याशीवाय दिवसभर दर्जेदार दर्जेदार कथाकथन,परिसंवाद चर्चासत्र सादर झाली.
बीडमध्ये तीन दिवशीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन होत आहे. सोमवारी दुसर्या दिवशी मोठ्या उत्साहत हे साहित्य संमेलन पार पडले यावेळी शेतकर्यांच्या आत्महत्या या विषयावर पा. वैभव नून (यवतमाळ), लेविन भोसले, फ्रॅन्को डिसोझा यांनी दर्जेदार शोधनिबंध सादर केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद म्हाळुंगेकर (कोल्हापूर) हे होते. त्यानंतर विवाहितांच्या घटस्फोटांची कारणे आणि उपाय या विषयावर परिसंवाद सादर झाला. त्यांनर ख्रिस्ती समाजाविषयीचे समज गैरसमज याविषयी सादर करण्यात आला. त्यानंतर दर्जेदार कथाकथन रंगले. यावेळी स्त्रोते मंत्रमुग्ध झाले होते. त्यांनतर झालेल्या चर्चासत्रात पुढे बोलतांना किशोर पाटील म्हणाले की, सध्या साहित्यिक हे साठ वर्षापासून 82 वर्षापर्यंत आहे. तीस वर्षापासून साठ वर्षापर्यंत असलेल्या साहित्यिकांची संख्या फार कमी आहे. नवीन साहित्यिक कसे तयार होणार? कधी तयार होणार वाचाल तर वाचाल हे प्रसिद्ध वचन आहे. आपल्या समाजातली मुलं वाचत नाही मुळात तर शिकतच नाहीत. बीएससी नर्सिंग हे आता सुरू झालं आहे. त्या अगोदर जीएनएम किंवा फार फार तर बीएससी नर्सिंग, पीएचडी त्याच्यापुढे आपण गेलं पाहिजे. भारतीय प्रशासकीय सेवेकडे आपली मुलं कधी जाणार त्यासाठी आपल्या कॉन्व्हेंट स्कूल काय करताय? मुलं शिकणार नाहीत तर त्यांचा उद्धार होणार नाही पण शिक्षणामध्ये आपलेच लोक जर अडथळे आणत असतील तर नवीन साहित्यिक तयार होणार नाहीत. हे असेच कुठेतरी शिकतील पटकन कुठेतरी जॉबला लागतील. जोपर्यंत आपल्या शाळा, सुदृढ असणारे आपले चर्च ख्रिस्ती मुलांना शिकण्यासाठी मदत करणार नाहीत तोपर्यंत हे चित्र बदलणार नाही. कॉन्व्हेंट स्कूलच्या सगळ्या प्रशासन, व्यवस्थापकांनी ख्रिस्ती मुलांना मोफत शिक्षण द्यावे.आयएस, आयपीएस, भारतीय प्रशासकीय सेवेतील लोकांना आपल्या शाळेमध्ये बोलवावे त्यांच्यासोबत चर्चासत्र घ्यावीत. त्यांचे अनुभव कथन करु द्यावेती ते मुलांना ऐकू द्यावीत. त्यांच्या अनुभवातून त्यांच्या कहाणीतून त्यांना प्रेरणा मिळू शकते. शेख अन्सार 21 वर्षांचा मुलगा जालना जिल्ह्यातील बदनापूर मधला आयएएस झाला त्याचा मोठ्या भावाने स्वतः नोकरी शिक्षण सोडलं वीट भट्टीवर कामाला गेला, बाप रिक्षा चालवतो दोघांनी मिळून त्याचा शिक्षणाचा खर्च उचलला तो शिकला पहिल्याच प्रयत्नात 21 व्या वर्षी आयएएस झाला तो शिकला म्हणून आयएस झाला त्याच्या आई बापाने कष्ट घेतले म्हणून तो आयएएस झाला. असे कष्ट जर आपल्या स्कूलने, भक्कम असलेले चर्चेस ने घेतले. आर्थिक दृष्ट्या जर सढळपणे मुलांना शिक्षणासाठी मदत केली तर नक्कीच आपल्या ख्रिस्ती तरुण तरुणी आयएएस, आयपीएस, डॉक्टर्सला नक्कीच पात्र आहेत. मराठी ख्रिस्ती साहित्याला खूप मोठी चांगली समृद्ध अशी परंपरा आहे परंतु ती परंपरा पुढे चालवण्यासाठी इंथ नविन साहित्यिक होणे गरजेचे आहेत. ते इथे कुठे दिसत नाहीत. स्कूल चर्चेस आणि इतर एनजीओने ज्यांना शिकण्यासाठी मदत आवश्यक आहे त्यांना मदत केली पाहिजे आणि नवीन नवीन मुलं पुढे आले पाहिजेत असं प्रखड मतकिशोर पाटिल यांनी व्यक्त केलं.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फादर प्रकाश भालेराव, सरचिटणीस चार्लस् सोनावणे, कोषाध्यक्ष प्रमविजय भालतिलक, स्वगताध्यक्ष आशिष शिंदे यांच्यासह किशोर पाटील, मारियन रेड्डी, सहचिटणीस बाबासाहेब गायकवाड, अशोक थोरात, अरुण गायकवाड, राजु जोसेफ, नितीन शिंदे, प्रितज म्हस्के, क्षितीज गायकवाड प्रतिक भालतिलक, स्तवन घुले, रेव्ह. अँनी सोनावणे, रेव्ह, सुनिल भोंगे, पा. संजय गायकवाड, पा. वारभुवन, पा. अमृत सोनवणे, पा. विल्सन कांबळे, पा.प्रकाश मजमुले, शर्मिला पाटील, निलीमा रामटेके, दिलीप चांदणे, पीटर रेड्डी, बिपीन देशमुख, सुरेश वादव, आतिष काळे, अविनाश चांदणे परिश्रम घेतले.